शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडिलांची नोकरी गेली, आई नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडली अन्…; प्रार्थना बेहरेने सांगितला ‘तो’ संपूर्ण प्रसंग, म्हणाली, “पैशांची अधिक गरज…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 26, 2023 | 1:28 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prarthana Behere Struggle Story

वडिलांची नोकरी गेली, आई नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडली अन्...; प्रार्थना बेहरेने सांगितला 'तो' संपूर्ण प्रसंग, म्हणाली, "पैशांची अधिक गरज..."

प्रत्येक कलाकारांच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. बऱ्याच कलाकारांना त्यांच्या कुटुंबियांना संघर्षातून जावं लागतं. मात्र जिद्दीने, मेहनतीने ही कलाकार मंडळी त्यांचं नाव मोठं करतात. अशीच एका मराठमोळ्या अभिनेत्रीची संघर्षकथा समोर आली आहे. आजवर आपल्या सुंदरतेने, मोहकतेने व अभिनयाने प्रेक्षकांना मोहिनी घालणारी ही अभिनेत्री आहे प्रार्थना बेहरे. प्रार्थनाने नुकत्याच तिच्या युट्युब चॅनेलवरून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी तिने तिचा दागिन्यांच्या नामांकित कंपनीची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर होण्याचा प्रवास सांगितला. यावेळी तिने एक आठवणही शेअर केली. (Prarthana Behere Struggle Story)

लहानपणीची आठवण शेअर करत प्रार्थना म्हणाली की, “माझे बाबा टेक्सटाईल इंजिनीअर म्हणून एका मिलमध्ये काम करायचे. मला आठवतंय मी तेव्हा तिसरी-चौथीत होते. आणि एके दिवशी अचानक आम्हाला समजलं की, सगळ्या मिल्स बंद होऊन बाबांची नोकरी गेली आहे. त्यानंतर पुढची दोन वर्ष त्यांच्याकडे नोकरी नव्हती. तेव्हा बाबांनी मार्केटिंगमध्ये त्यांचं करिअर केलं आणि व्यवसाय सुरू केला. पण, ती दोन वर्ष आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्षाचा काळ होता.”

आणखी वाचा – अंबानींच्या कार्यक्रमात करण जोहरला आला होता ‘पॅनिक अटॅक’, वरुण धवनचं लक्ष गेलं अन्…; स्वतःच केला मोठा खुलासा

प्रार्थना पुढे म्हणाली, “बाबा नोकरी करत नसल्याने आईला नोकरी करणं भाग होतं. त्यामुळे माझी आई एका इंटरव्ह्यूला गेली. नामांकित दागिन्यांच्या दुकानात ती नोकरीसाठी गेली होती. सोनाराच्या दुकानांमध्ये ज्या मुली जॉब करतात त्या कामासाठी आई गेली होती. त्यावेळी मुलाखत घेऊन झाल्यानंतर माझ्या आईला रिजेक्ट करण्यात आलं होतं. आई घरी आल्यावर आम्ही तिला विचारलं, ‘काय झालं आई जॉबचं?’ तेव्हा तिने मला घडलेला प्रकार सांगितला. “तुम्ही दिसायला खूपच साध्या आहात. तुमच्या कानात, गळ्यात काहीच सोनं नाही. तुम्हाला जर इथे नोकरी करायची असेल तर तुम्ही इथून काही सोनं विकत घ्या आणि स्वतःला सुंदर बनवा” असं माझ्या आईला तेव्हा सांगण्यात आलं होतं. मी लहान असूनही माझ्या ती गोष्ट कायम मनात राहिली होती.तेव्हा आई असं म्हणाली की, “आता सोनं घेऊन नोकरी करण्यापेक्षा आता आपल्याला पैशांची अधिक गरज आहे.”

आणखी वाचा – लग्नाच्या पाच वर्षांनी दीपिका पदुकोण व रणवीर सिंगच्या लग्नाचे खास व्हिडीओ व फोटो समोर, नेटकरी म्हणाले, “बाजीराव-मस्तानी…”

“आईने सांगितलेली घटना ऐकल्यावर मी त्यादिवशी मनात ठरवलं की, आयुष्यात खूप काहीतरी मोठं करायचं जेणेकरून माझ्या आई-बाबांना कुठेच रिजेक्शन मिळणार नाही… त्यांना जे हवंय ते सगळं मी त्यांना मिळवून देणार. पुढे, एके दिवशी मला अचानक फोन आला आणि एका नामांकित दागिन्यांच्या कंपनीकडून ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरसाठी विचारणा करण्यात आली होती. तेव्हा मी लगेच माझ्या आईला फोन करून ही गोष्ट सांगितली होती. तिला प्रचंड आनंद झाला होता. आपल्या मनात जिद्द असेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो याची जाणीव मला त्या क्षणाला झाली.” असं प्रार्थनाने सांगितलं.

Tags: entertainmentmarathi actressmarathi malikamarathi moviemarathi serialprarthana beherePrarthana Behere Struggle StoryPrarthana Behere talk about her Father
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Hemangi Kavi On Vanita Kharat Husband

"हे नवरे लोक…", वनिता-सुमितच्या फोटोवर हेमांगी कवीची कमेंट, वनिताच्या नवऱ्याचं उत्तर, म्हणाला, "पुढच्या वेळेपासून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.