बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या पाच वर्षांनी दीपिका पदुकोण व रणवीर सिंगच्या लग्नाचे खास व्हिडीओ व फोटो समोर, नेटकरी म्हणाले, “बाजीराव-मस्तानी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 26, 2023 | 10:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Deepika Ranveer Wedding Video

लग्नाच्या पाच वर्षांनी दीपिका पदुकोण व रणवीर सिंगच्या लग्नाचे खास व्हिडीओ व फोटो समोर, नेटकरी म्हणाले, "बाजीराव-मस्तानी…"

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी आहे. या जोडीचा फॅन फॉलोविंगही खूप मोठा आहे. नुकतीच या जोडीने करण जोहरचा टॉक शो ‘कॉफी विथ करण सीझन ८’ मध्ये हाजरी लावली होती. काही दिवसांपासून त्यांच्या या शोमधील एंट्रीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता. अशातच त्यांच्या लग्नादरम्यानच्या आणखी एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पहिल्यांदाच ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात दीपिका, रणवीरच्या लग्नसोहळ्यातले खास क्षण पाहायला मिळाले. (Deepika Ranveer Wedding Video)

या जोडप्याच्या लग्नाच्या व्हिडिओपासून ते कार्यक्रमादरम्यान रणवीर आणि दीपिकाने केलेलं एकमेकांचे कौतुक अशा प्रत्येक क्षणाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा स्वप्नवत असा लग्नाचा व्हिडिओ ‘कॉफी विथ करण ८’च्या पहिल्या भागात पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आला.

आणखी वाचा – “चांगले कार्य करताना…” प्रशांत दामले यांच्या फेसबुक पोस्टवर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्याने दिलं उत्तर, म्हणाले…

‘कॉफी विथ करण ८’या कार्यक्रमात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रत्येक सोहळ्याची झलक दाखवण्यात आलेली पाहायला मिळतेय. दीपिकाशी लग्न करण्याच्या दिवशी रणवीर असं बोलताना दिसतोय की, ‘मी म्हणालो होतो की एक दिवस मी दीपिका पदुकोणशी लग्न करेन, आणि बघा, आज तो दिवस आहे.’ असं म्हटल्यानंतर दोघांच्या लग्नाच्या सुंदर अशा व्हिडिओला सुरूवात होते.

View this post on Instagram

A post shared by Vishal Punjabi (@theweddingfilmer)

दीपिका रणवीरच्या लग्नातील खास क्षण पहिल्यांदा समोर येताच त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओच्या अनेक क्लिप पोस्ट करण्यास चाहत्यांनी सुरुवात केली आहे. दीपिका व रणवीरचा एक व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर करत त्यांच्या एका चाहत्याने ट्विट करत म्हटलं आहे की, ‘रात्रीचे १२ वाजले आहेत आणि मी रडत नाही आहे मित्रांनो. रणवीर सिंगने दीपिका पदुकोणची अक्षरशः पूजा केली. दीपिकावर त्याचं प्रेम इतकं आहे की तो एक वेडेपणा म्हणावा लागेल.’

आणखी वाचा – महेश भट्ट विवाहित असूनही त्यांच्या प्रेमामध्ये वेड्या होत्या सोनी राजदान, पहिल्या पत्नीपासून दोन मुलीही होत्या अन्…

त्यांच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट आल्या आहेत, एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, ‘भाई रणवीर ज्या पद्धतीने दीपिकाकडे पाहतो, ज्या पद्धतीने तिचा आदर करतो त्या पद्धतीने त्याने सार्यांना हे दाखवून दिलं की, त्याने तिला आयुष्यभरासाठी जिंकले आहे.’ तर आणखी एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे की, ‘ते खरे तर बाजीराव-मस्तानी आहेत.’

Tags: deepika padukonedeepika ranveer koffee with karandeepika ranveer weddingDeepika Ranveer Wedding Videoentertainmentkoffee with karanranveer singh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav Gets an Extortion Call

'बिग बॉस ओटीटी' फेम एल्विश यादवकडे अज्ञातांनी केली १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी, पोलिसांत गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.