शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंबानींच्या कार्यक्रमात करण जोहरला आला होता ‘पॅनिक अटॅक’, वरुण धवनचं लक्ष गेलं अन्…; स्वतःच केला मोठा खुलासा

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 26, 2023 | 12:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Karan Johar talks about his Panic Attack

अंबानींच्या कार्यक्रमात करण जोहरला आला होता 'पॅनिक अटॅक', वरुण धवनचं लक्ष गेलं अन्...; स्वतःच केला मोठा खुलासा

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध चॅट शो ‘कॉफी विथ करण’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचं सूत्रसंचालन बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. या शोमध्ये बॉलिवूडसह अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी हजेरी लावली. ज्यात अनेकांनी त्यांच्या खासगी आयुष्याशी निगडित अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याची चर्चादेखील अनेकदा रंगते. लवकरच या शोचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून शोच्या पहिल्या भागात अभिनेत्री दीपिका पदुकोण व रणवीर सिंह हे हजेरी लावणार आहे. काही दिवसांपूर्वी या शोचा पहिला प्रोमो आला होता, ज्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली होती. अशातच आणखी एक प्रोमो समोर आला, ज्यामध्ये करण त्याला मुंबईतील एका कार्यक्रमात आलेल्या ‘पॅनिक अटॅक’ बद्दल मोठा खुलासा केला आहे. (Karan Johar talks about his Panic Attack)

यावर्षीच्या एप्रिल महिन्यात मुंबईतील ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा’चे उद्घाटन पार पडले होते. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक बॉलिवूड तारे-तारकांनी हजेरी लावली होती. दिग्दर्शक करण जोहरही या सोहळ्याला उपस्थित राहिला. मात्र, या कार्यक्रमादरम्यान त्याला ‘पॅनिक अटॅक’ आला होता. त्यानंतर त्याला आलेल्या या अनुभवाबद्दल बोलला. करणने सुरुवातीस दीपिकाच्या मानसिक आजाराशी यशस्वी लढा दिल्याबद्दल तिचं कौतुक केलं. त्यानंतर त्याला आलेल्या मानसिक त्रासाबद्दल भाष्य केलं.

हे देखील वाचा – “रिलेशनशिपमध्ये राहणं…”, लग्न न झाल्याचं करण जोहरला दुःख, भर कार्यक्रमात रडू कोसळलं, म्हणाला, “सिंगल असणं…”

करण यावेळी म्हणाला, “जेव्हा मुंबईत ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा’चं उद्घाटन सोहळा पार पडत होता. तेव्हा मला ‘पॅनिक अटॅक’चा त्रास जाणवू लागला. मला आठवतं, त्यावेळेस वरुण धवन माझ्याकडे पाहत होता. माझा चेहरा अक्षरशः घामाने भरलेला होता, हे कधीही मला कळले नाही. त्यावेळेस वरुण माझ्याकडे येत त्याने माझी विचारपूस केली. माझे हाथ थरथरलेले होते. तेव्हा वरुणने मला एका खोलीत नेले. सुरुवातीला वाटलं की, मला हृदयविकाराचा झटका आला होता. पण मला कळत नव्हतं की, नेमकं काय झालं होतं. मी नंतर माझं लांब जॅकेट काढलं. त्यानंतर काही तासातच मी माझ्या घरी पोहोचलो. माझ्या रूमवर पोहोचलो आणि रडलो. मी का रडत होतो, हेच मला त्यावेळेस कळत नव्हतं.”

हे देखील वाचा – ‘बिग बॉस ओटीटी’ फेम एल्विश यादवकडे अज्ञातांनी केली १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी, पोलिसांत गुन्हा दाखल

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

“हा त्रास घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या मानसोपचार तज्ज्ञाला बोलावलं. त्यांना विचारलं की, ‘मी काय करू शकतो? कारण मी सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. आणि माझा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.’ तेव्हा त्यांनी मला एक औषध दिलं, जे अजूनही मी घेत आहे. हा भाग माझी आई पाहणार आहे, याची मला कल्पना आहे.”, असं करण यावेळी म्हणाला.

Tags: bollywood newskaran joharKaran Johar talks about his Panic Attackkoffee with karan
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Prarthana Behere Struggle Story

वडिलांची नोकरी गेली, आई नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडली अन्…; प्रार्थना बेहरेने सांगितला 'तो' संपूर्ण प्रसंग, म्हणाली, "पैशांची अधिक गरज…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.