आजकाल सगळीकडेच फिटनेस हा ट्रेंड बनला आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारापर्यंत सगळ्यांनाच फिट राहण्याचे क्रेज चढले आहे. आणि हे क्रेज आरोग्याच्या दृष्टिकोनातून शरीरासाठी फायदेशीर आहे. कोणत्याही कलाकाराला फिट राहणं खुप महत्वाचं असतं. त्यामुळे अनेक कलाकार स्वतःला फिट ठेवण्यासाठी डाईट सोबत एक्सरसाइज तसेच योगा करताना दिसतात. नुकताच अभिनेत्री जानव्ही किल्लेकरने वर्कआउट नंतरचा फोटो पोस्ट केला आहे. (Jahnavi Killekar Workout Look)
या फोटोमध्ये जानव्हीने वर्कआऊटचा ड्रेस परिधान केला आहे. आणि आरशासमोर पोज देत तिने हा फोटो काढला आहे. जानव्ही ने या फोटोला After workout असे कॅप्शन दिले आहे. जानव्ही या फोटोमध्ये सुद्धा खूप फिट दिसत आहे. जान्हवीच्या ह्या फोटोला चाहत्यांनी देखील पसंती दर्शवली आहे.

हे देखील वाचा: वैदेहीच्या फोटोवर चाहत्याची मजेशीर कमेंट
सध्या जान्हवी आपल्याला “भाग्य दिले तू मला” या मालिकेत खलनायिकेची भूमिका करत असून यात ती सानिया नावाचे पात्र साकारत आहे. जरी जानव्ही या मालिकेत नेगीटिव्ह भूमिकेत असली तरी तिने तिच्या चाहत्यांना तिच्या अभिनयाने तसेच घारे डोळ्यांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. याच बरोबर जानव्ही स्वभावाने बिनधास्त आहे. जानव्हीने एका नाटकात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं होतं. बघता बघता जानव्ही त्याच नाटकात लीड डान्सर म्हणून काम करू लागली. (Jahnavi Killekar Workout Look)
हे देखील वाचा: जान्हवी करतेय मुलाला मिस
त्यानंतर जानव्हीने तिचा मोर्चा अभिनय क्षेत्राकडे वळवला. बऱ्याच जणांना माहित नसावं की जानव्हीने स्टार प्रवाह या वाहिनीवरील रुंजी या मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं, परंतु या मालिकेत जानव्हीला तेवढा नाव मिळालं नाही. याच बरोबर जानव्हीने अनेक म्युजिक अल्बम मधून स्वतःची नृत्य कला प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. तिचे “कोळीवाडा झिंगला” तसेच “दर्याची मासोळी” हे दोन्ही अल्बम साँग प्रचंड फेमस झाले होते. जानव्हीने “भाग्य दिले तू मला” या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारण्यापूर्वी “आई माझी काळूबाई” या मालिकेत मुख्य खलनायिकेची भूमिका साकारली आहे.