महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं, या कार्यक्रमाच्या संपूर्ण कलाकारांवर महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं. “पोस्ट ऑफिस उघड आहे” या मालिकेत आपल्याला हास्यजत्रा कार्यक्रमातील काही कलाकार दिसले होते. (Post Office Ughada Ahe)
हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या ” वेट क्लाउड प्रोडक्शन” च्या मार्फत “पोस्ट ऑफिस उघड आहे” ही मालिका तयार झाली. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची पोस्ट सचिन गोस्वामींनी केली होती. या मालिकेचा शेवटचा भाग २ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याचं देखील त्याची सांगितलं आहे. नुकताच या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरु केलाय.
हे देखील वाचा: श्रीदेवी सारखी दिसते प्राजक्ता लुकची होतीये सगळीकडे चर्चा
“पोस्ट ऑफिस उघडं आहे” च्या कलाकारांनी त्यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला त्यांचे ९० दिच्या काळातले फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शन मध्ये कलाकार म्हणतायत ”पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेमुळे आम्हांला आणि तुम्हांलाही ९० च्या काळात नेलं तर हा आहे माझा १९९७ मधील फोटो. (Post Office Ughada Ahe)
आणि पुढे कलाकारांनी काही व्यक्तींना टॅग करत नॉमिनेट केलं आहे. नॉमिनेट केलेली व्यक्ती पुढे हा ट्रेंड सुरु ठेवताना दिसत आहेत. चेतना भट, प्रसाद खांडेकर, समीर चौघुले, दत्ता मोरे, ऐशा डे या कलाकारांचा ट्रेंड मध्ये समावेश आहे.
हे देखील वाचा: पिवळ्या ड्रेसमध्ये शिवालीचा “बोल्ड”अंदाज
याच बरोबर या कार्यक्रमाचे निर्माते सचिन गोस्वामींनी देखील हा ट्रेंड फॉलो केला आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याने देखील काही व्यक्तींना नॉमिनेट करत ही पोस्ट शेअर केली आहे. “पोस्ट ऑफिस” ही संकल्पना जुनी असून ९०च्या काळात पत्र पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस चा वापर केला जायचा. परंतु आता इंटरनेटच्या काळात देखील या मालिकेमुळे नवीन पिढीला त्याचा अनुभव घेता आला आहे.