अभिनेत्री प्राजक्ता माळीने सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली. प्राजक्ताने मालिका, वेब सीरिज, चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सिनेमाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ताच नाव घेतलं जात. प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावरही बर्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरील तिचे फोटोशूटचे फोटो चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडतात. अशातच प्राजक्ता मनसे पक्षाच्या गाण्यावर थिरकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.(Prajakta Mali)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नेते राज ठाकरे यांचा फॅन फॉलोविंग खूप मोठा आहे. त्यांचा चाहतावर्ग इतका मोठा आहे की त्यांच्या सभेला श्रोत्यांची तुंबड गर्दी असते. त्यांना भेटायला प्रत्येकजण ताटकळत असतो. सामान्य प्रेक्षकवर्गच नाही तर कलाकार मंडळीही राज साहेबांचे फॅन आहेत. अशातच अभिनेत्री प्राजक्ताही राज साहेबांची खूप मोठी चाहती आहे. तिच्या प्राजक्तराज या ज्वेलरी ब्रॅण्डच्या उदघाटन सोहळ्यालाही राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.
पहा प्राजक्ताच मनसे प्रेम (Prajakta Mali)
राज ठाकरे यांच्या संभांनाही प्राजक्ता हजेरी लावताना दिसते. अशातच मनसेच्या गाण्यावर प्राजक्ता माळीने केलेला डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता मनसेच्या नव्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. ‘प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया’ असे मनसेच्या या गाण्याचे बोल आहेत. (Prajakta Mali)

तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शिवाय चाहत्यांकडून त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत प्राजक्ताच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. प्राजक्ताचा हा मनसे पक्षाच्या गाण्यावरील डान्स व्हिडीओ आणि मनसे पक्षाबद्दलची तिची आत्मीयता पाहून प्राजक्ता माणसे पक्षात प्रवेश करणार का ? याची भुणभुण सार्यांना लागून राहिली आहे.
हे देखील वाचा – “विराट कोहली”‘नम्रताचा ‘या’ फोटोवर चाहत्यांची भन्नाट कमेंट
प्राजक्ताचा सोशल मीडियावरही खूप मोठा वावर आहे. अधूनमधूनती तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. चाहते ही तिच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव करताना दिसून येतात. प्राजक्ताने मनसे पक्षाच्या गाण्यावर केलेला डान्स खूपच लक्षवेधी असून या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होतोय.
