बायकोचा हात हातात प्रभाकर मोरेंचा समुद्रकिनारी रोमँटिक अंदाज

Prabhakar More Family Time
Prabhakar More Family Time

कलाकारही शुटिंगमधून मिळालेल्या मोकळ्या वेळेत आपल्या कुटुंबियांना, प्रियजणांना नेहमीच वेळ देताना दिसतात. त्यांचे कुटुंबासोबतचे रिअल लाईफ फोटो व्हिडीओ ते नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. कलाकारांच्याही खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरेंच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. शालू हे गाणं ऐकलं की महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतल्या प्रभाकर मोरेंची आठवण आल्यावाचून राहत नाही. कोकणी भाषेत विनोद करणाऱ्या प्रभाकर मोरेंनी हास्यजत्रेत चांगलाच कल्ला केलाय. प्रभाकर मोरे हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.(Prabhakar More Family Time)

पहा प्रभाकर मोरेंचा बायकोसोबतचा रोमँटिक अंदाज (Prabhakar More Family Time)

नुकताच प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या पत्नीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. बिझी शेड्यूल मधून वेळ काढून प्रभाकर मोरे त्यांच्या पत्नी सोबत वेळ घालवताना दिसत आहेत. समुद्र किनारी बायकोसोबत हातात हात घालून ते एकेमकांसोबत वेळ घालवत आहेत. दरम्यान दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. त्यांचा या रोमँटिक अंदाजात असलेल्या व्हिडीओला प्रेक्षकांचीही पसंती मिळतेय. कोकणची लोकधारा जपणारे प्रभाकर मोरे हे त्यांच्या शालू या गाण्यामुळे प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरतात.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे प्रभाकर मोरे यांना विशेष लोकप्रियता मिळाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. रात्री जेवताना हा कार्यक्रम पाहिल्याशिवावय तर कित्येकांच्या घशाखाली घासही उतरत नाही.(Prabhakar More Family Time)

‘पांघरुण’, ‘टकाटक’, ‘कुटुंब’, ‘कट्टी बट्टी’, ‘बाई गो बाई’, ‘भाई-व्यक्‍ती की वल्ली’, ‘धोंडी चम्प्या – एक प्रेमकथा’ या चित्रपटांमधून प्रभाकर मोरे यांनी आपल्या कामाची जादू दाखवली. तसेच कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमांमधील प्रभाकर मोरे यांच्या विनोदी शैलीचे प्रेक्षकही चाहते आहेत. त्यांचे आगळेवेगळे पात्र रसिक प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडते.

हे देखील वाचा – मृणालच्या लेकीची सायकल सवारी,क्युट व्हिडीओ नक्की बघा

कोकणवासी असलेल्या प्रभाकर मोरेंनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. सांस्कृतिक पदाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रभाकर मोरे सांभाळत आहेत. प्रभाकर मोरे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये विनोदी आणि सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमीच विशेष पसंती मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Vanita Kharat talks obesity
Read More

‘मी जाड आहे पण..’ लठ्ठपणावर केलं वनिताने परखड भाष्य

परखड, बिनधास्त व्यक्तिमत्वांमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात. आपल्या मनाला वाटेल ते कायम करणं,…
Onkar Bhojane Ankita Walavalkar
Read More

अंकिता आणि ओंकारच्या हळदीची रंगली चर्चा

कलाकार मंडळींनी आपला क्रश सांगितला की, प्रेक्षक त्यांच्यात नातेसंबंध असल्याच्या चर्चा करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेल्या ओंकार…
Hindustani Bhau Sameer Wankhede
Read More

हिंदुस्थानी भाऊचा समीर वानखेडेला पाठिंबा-जाणून घ्या काय म्हणाला हिंदुस्थानी भाऊ?

एनसीबी चे माजी संचालक समीर वानखेडे,अभिनेता शाह रुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेल्या अटकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले
Jitendra Joshi Daughter Reva
Read More

“लेकीची १३ व्या महिन्यात पहिली ट्रिप ते १३ व्या वर्षी पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप” जितू आणि रेवाची लंडन वारी, शेअर केला खास व्हिडिओ

सगळ्या नात्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रेमळ नातं समजलं जात ते म्हणजे वडील आणि मुलीचं. सध्या परदेशवारीत बिझी आहे मराठी…