“सैराट” या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावेल. या चित्रपटासोबतच या चित्रपटातील नायिका रिंकू राजगुरूला देखील बरीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातनंतर रिंकू मध्ये बरेच चांगले बदल पाहायला माळले. रिंकू आता मराठी चित्रपट सृष्टीचा मध्यबिंदू म्हणून ओळखली जाते. रिंकू नुकतीच तिच्या कुटूंबासह दक्खनच्या राजाचे म्हणजेच जोतिबाचे दर्शन घेतले आहे. या बद्दलचा व्हिडीओ रिंकूने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.(Rinku Rajguru Jyotiba Darshan )
हे देखील वाचा: ‘लोकनाट्याला उशीर झाला तरी चालेल पण याची चांगलीच जिरवायची…’ म्हणून दादा कोंडके यांनी जिरवली होती ‘त्या’ हॉटेल वाल्याची खोड
या व्हिडिओला रिंकूने “चांगभलं” असे भक्तिमय कॅप्शन दिले आहे. रिंकूला तिच्या सगळ्या चाहत्यांनी देखील तिच्या कॅप्शन मध्ये चांगभलं असं म्हंटल आहे. तर रिंकूच कोल्हापूरमध्ये स्वागत आहे असं देखील एका चाहत्याने म्हंटल आहे. रिंकूने ज्योतिबाच्या दर्शनाला येण्याचं काही कारण असेल का? असा देखील चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
रिंकूने सैराटमध्ये ज्या अंदाजात म्हंटल होत मराठीत सांगितलेलं कळत नाही का.? तिच्या या ठसकेबाज अभिनयामुळे रिंकू ची लोकप्रियता सर्वदूर पोहोचली. रिंकू शाळेत असताना तिने सैराट चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. नागराज मंजुळे यांना सुद्धा रिंकू हीच आर्ची या पात्रासाठी योग्य वाटली होती. रिंकू आणि इतर कलाकार चित्रपट सृष्टीत नवीन असल्यामुळे त्यांना कॅमेऱ्याची काही सवय न्हवती.परंतु नागराज यांनी इतर कलाकारांसोबतच रिंकूला सुद्धा प्रशिक्षण दिलं. (Rinku Rajguru Jyotiba Darshan )
हे देखील वाचा: बायकोचा हात हातात प्रभाकर मोरेंचा समुद्रकिनारी रोमँटिक अंदाज
अभिनय क्षेत्रात उतरल्यानंतर रिंकूने स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणले. रिंकूने फक्त वजनच कमी केले नाही तर सोबतच तिची भाषा देखील सुधरवली. सैराट नंतर रिंकूला अनेक चित्रपटाच्या ऑफर्स आल्या. यातील रिंकूने झुंड, कागर, मेकअप या चित्रपटात रिंकूने काम केलं आहे. याचबरोबर रिंकूचा “आठवा रंग प्रेमाचा” हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याचं बरोबर रिंकू सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रिय असते. अलीकडे रिंकू वेगवेगळे फोटोशूट करताना दिसते. रिंकू तिच्या फोटोशूटचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करतच असते.