योग ही एक जीवनशैली आहे. योगामुळे श्वासावरचं नियंत्रण, मानसिक शांतता या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. सर्वसामान्यांसपासून कलाकार मंडळींपर्यंत योगा करून प्रत्येक जण स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. विशेषतः कलाकार मंडळींमध्ये योगाच प्रमाण अधिक जाणवतं. एक कलाकार म्हणून श्वासावरील नियंत्रण, चढ – उतार, क्षमता वाढवण्याची योगाचा फार उपयोग होतो. (Fitness Freak Celebrities)
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आटोक्यात ठेवण्यासाठी योगधारणेची अत्यंत आवश्यकता असते. अशातच कलाकार मंडळींमध्ये काही कलाकार मंडळी हे अधिकतर योगा फ्रिक असतात. नेहमीच सोशल मीडियावरून ते चाहत्यांसोबत योगा करतानाचे अनेक व्हिडीओज शेअर करत असतात.
पाहा कोण आहेत योगा फ्रिक अभिनेत्री (Fitness Freak Celebrities)
योगा फ्रिक कलाकारांमध्ये अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे पन्नाशी ओलांडली तरी जिच्या सौंदर्यात तिळमात्र बदल झालेला नाही अशी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. फिट राहणं म्हणजे नेमकं काय हे ऐश्वर्या यांच्याकडे पाहून कळत. अभिनेत्री ऐश्वर्या नेहमीच त्यांचे योगा करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून पोस्ट करत असतात. ज्यामुळे प्रेक्षकांना आणि चाहत्यांना त्यांच्याकडून योगाचे अनेक धडे मिळतात.
त्यानंतर आपण जिला रोज छोट्या पडद्यावर पाहतो अशी अभिनेत्री म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेतील माधवी निमकर. माधवीने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंच आहे मात्र माधवी तिच्या योगासनांमुळेही लोकप्रिय आहे. तिचे अभिनयसोबतही योगाचेही अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावरून ती नेहमीच तिचे योगा करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. माधवी किती फिट आहे हे आपण छोट्या पडद्यावर पाहतच आलोय.(Fitness Freak Celebrities)
हे देखील वाचा – ‘बाकी सब मोह माया है।’ शिवानीच्या लूकने झाली मालिकेची आठवण
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आजवर तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे. अभिनयासोबतच योगा हा व्यायाम प्रकार प्राजक्ताच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. ती नेहमीच तिच्या चाहत्यांना योगाविषयी जागरुक करताना दिसते. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांना योगाचे सल्ले ही देताना दिसते.
बऱ्याच कालावधी नंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलेली अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे. उत्कृष्ट नृत्यांगणा म्हणून आजही उर्मिलाचे लाखो चाहते आहेत. शिवाय हल्ली उर्मिलाची वेगळ्या पद्धतीने ही ओळख करून दिली जाते ती म्हणजे जिजाची फिट मॉम. एका मुलीच्या जन्मानंतरही उर्मिलानं स्वत:ला कमालीचं मेटेंन ठेवलं आहे. तिच्या फिटनेससाठी सगळेच तिचं कौतुक करत असतात.(Fitness Freak Celebrities)
हे देखील वाचा – प्राजक्ता माळीच बोल्ड फोटोशूट होतयं वायरल
महाराष्ट्राची अप्सरा म्हणून लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीने आजवर चित्रपट मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सोनाली तिच्या फिटनेसबाबत नेहमीच सतर्क असते. सोशल मीडियावर ही सोनाली नेहमीच तिचे योगा करतानाचे व्हिडीओ पोस्ट करत असते.
अभिनेत्रींना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतंच. स्क्रीनवर सुंदर दिसण्यासोबत फिट असणं ही आवश्यक असत,