गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रेंजुषा मेनन व डॉ. प्रिया यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. आता आणखी एका अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तमिळ अभिनेते रघु बलैया उर्फ ज्युनिअर बलैया यांचे चेन्नईतील राहत्या घरी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. मात्र त्यांच्या निधनांबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांच्या निधनाने तमिळ सिनेसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (South actor Junior Balaiah passed Away)
प्रसिद्ध अभिनेते रघु बलैया उर्फ ज्युनिअर बलैया हे गेल्या अनेक दिवसांपासून चेन्नईतील घरात राहत होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रघु बलैया यांचा मृत्यू घरात गुदमरून झाल्याचे सांगण्यात आले आहे. आज पहाटे त्यांचं निधन झालं असून त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रघु यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ज्यामध्ये ‘करकतक्करण’, ‘गोपुरा वासलिले’ ‘सुंदरकंदम’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. पण २०१२ मध्ये आलेल्या ‘सत्ताई’ चित्रपटातील मुख्याध्यापकाच्या भूमिकेमुळे त्यांना खरी लोकप्रियता मिळाली.
हे देखील वाचा – Video : हात पकडून स्टेजवर आणलं, मिठी मारली अन्…; शाहरुख खानने मराळमोळ्या मुक्ता बर्वेला दिलेली वागणूक पाहून रंगली तुफान चर्चा
Junior Balaiah Actor and son of the legendary Tamil cinema Comedian TS Balaiah, Junior Balaiah, has passed away ..
— Deepa Chandrasekar (@Deepajashsam) November 2, 2023
RIP???? pic.twitter.com/9KNpUOLxB5
तमिळ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते टीएस बलैया यांचे सुपुत्र असलेले रघु बलैया यांचा जन्म २८ जून १९५३ रोजी झाला. सिनेसृष्टीत येण्याआधी त्यांनी नाट्यकलावंत म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे. तर शिवकुमार आणि कमल हसन यांच्या ‘मेलनट्टू मरुमगल’ या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ते सहायक व्यक्तिरेखांच्या भूमिकेमुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले. त्याचबरोबर, शिवाजी गणेशन यांच्यासह ‘त्यागम’ चित्रपटात, तर कमल हसनसह ‘वाजवेय मायम’ चित्रपटात एकत्र झळकले आहेत.
हे देखील वाचा – ऑनलाईन शॉपिंग स्कॅममध्ये अडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, तुमच्याबरोबरही घडू शकते अशी घटना, म्हणाली, “मी पूर्णपणे…”
பழம்பெரும் நடிகர் டி.எஸ்.பாலையா அவர்களின் மகனான ஜூனியர் பாலையா ரகு, எனக்கு பதின்பருவ நண்பராக அமைந்தார். தந்தையைப் போலவே நாடக மேடைகளில் தன் கலையைத் தொடங்கி திரையில் வலம் வந்தவர் இன்று மறைந்து விட்டார். அவருக்கு என் அஞ்சலி. அவரது குடும்பத்தாருக்கு என் ஆறுதலைத்…
— Kamal Haasan (@ikamalhaasan) November 2, 2023
रघु यांनी चित्रपटांबरोबर ‘चिथी’, ‘वाजकई’ आणि ‘चिन्ना पापा पेरिया पापा’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलेलं आहे. २०१९ मध्ये आलेल्या अजितकुमार स्टारर “नेरकोंडा परवाई’ चित्रपटात काम केलं, तर २०२१ मध्ये आलेल्या ‘येनंगा सर उंगा सत्तम’ चित्रपटात शेवटचे दिसले होते. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.