हिंदी मालिकांमधील अभिनेत्रींपैकी एक लाडकी अभिनेत्री म्हणजे दीपिका कक्कर. तिने आपल्या अभिनयातून सगळ्यांची मनं जिंकली. दीपिका सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब असलेली दिसते. सध्या ती तिच्या मुलाच्या संगोपनावर भर देताना दिसते. पण ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. तिचा स्वतःचा युट्युब चॅनलही आहे. तिथे ती ब्लॉगच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांबरोबर जोडलेली राहते. अशाच एका ब्लॉगमधून तिने तिच्याबरोबर झालेल्या घोटाळ्याबद्दल स्पष्ट केलं. दीपिका ऑनलाईन डिलिव्हरी घोट्याळ्याला बळी ठरली आहे. तिने ही माहिती तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली. (dipika kakar online shopping scam)
दीपिकाने या स्कॅम विषयी सांगताना म्हणली, “माझी ऑनलाईन डिलिव्हरीमुळे फसवणूक झाली. मला एक पार्सल आलं होतं. जे माझ्या नावाने आलं होतं. त्यामुळे ते मीच मागवलं असल्याचं मला वाटलं. त्यामुळे मी डिलीवरी बॉयला पैसे पोच केले. पण त्यानंतर मला कळलं की ते पार्सल माझं नाही. मी ऑनलाईन शॉपिंग बरीच करते. कधी माझ्यासाठी तर कधी माझा मुलगा रुहानसाठी मी काही ना काही मागवत असते. त्यामुळे आलेलं पार्सल माझचं असावं असं मला वाटलं. डिलीवरी बॉयनेही कैश ऑन डिलीवरी पेमेंट आहे असं सांगितलं ते मी केलं. पण जेव्हा मी पार्सल खोललं तेव्हा कळलं की ते पार्सल माझं नाही”.
त्यानंतर ते पार्सल तिने रद्द करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी ओटीपी मागितला. जो द्यायला तिने पूर्णपणे नकार दिला. दीपिकाला कळलं की हा एक स्कॅम आहे ज्यात ती पूर्णपणे फसू शकली असती. तिने ही सर्व गोष्ट युट्युबला शेअर करत तिच्या चाहत्यांनाही याबाबत सतर्क केलं. हा स्कॅम कोणाबरोबरही होऊ शकतं. त्यामुळे यापासून सावधान राहण्याचा सल्ला दिला.
नेहमीच ओटीपीचं कारण देऊन ऑनलाईन फसवणूक होतानाच्या बातम्या समोर येत असतात. ओटीटी शेअर करताच काही वेळातच बैंकेतून पैसे नाहीशे होतात म्हणजेच हडपले जातात. त्यामुळे सरकारही नेहमी याप्रकारच्या धोक्यांबाबत लोकांना सतर्कतेचा इशारा देत असतं.