रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : हात पकडून स्टेजवर आणलं, मिठी मारली अन्…; शाहरुख खानने मराळमोळ्या मुक्ता बर्वेला दिलेली वागणूक पाहून रंगली तुफान चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 2, 2023 | 4:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mukta Barve On Shahrukh Khan

Video : हात पकडून स्टेजवर आणलं, मिठी मारली अन्…; शाहरुख खानने मराळमोळ्या मुक्ता बर्वेला दिलेली वागणूक पाहून रंगली तुफान चर्चा

प्रेक्षकांच्या लाडक्या किंग खानचा यावर्षी ५८वा वाढदिवस आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शाहरुखने आजवर जगभरात प्रचंड चाहते कमावले आहेत आणि याची प्रचिती दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला येते. २ नोव्हेंबरला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास किंग खानचे हजारो चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराजवळ जमतात. त्याच्या घराबाहेर आतषबाजी ही करण्यात येते, तसेच अनेक चाहते किंग खानच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करतात. या चाहत्यांमध्ये कलाकार मंडळीही मागे नाहीत. (Mukta Barve On Shahrukh Khan)

किंग खानचे बरेच कलाकार मंडळीही चाहते आहेत. अशातच शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मुक्ता बर्वेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुक्ता शाहरुखसह दिसतेय. या व्हिडिओमध्ये शाहरूख तिचा हात पकडून तिला स्टेजवर घेऊन येताना दिसतोय आणि तिला गालावरही किस करताना दिसत आहे. शाहरुख खान म्हणजे रोमान्सचा बादशाह अशी त्याची ओळख आहे. असं असलं तरी प्रत्येक स्त्रीबद्दल त्याला विशेष आदर आहे.

आणखी वाचा – प्रेम, २० वर्षांचा संसार अन्…; काही वर्षांपूर्वी असे दिसायचे ‘सातव्या मुलीची…’ फेम श्वेता व राहुल मेहेंदळे, अभिनेत्याला ब्रेनस्ट्रोकने घेरलं आणि…

View this post on Instagram

A post shared by Manjiri Naik (@manjiri_naik04)

पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही आजवर त्याने प्रत्येक स्त्रीकडे आदरयुक्त भावनेने पाहिलं आहे. मुक्ता बर्वेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘हृदयांतर’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळेचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. विक्रम फडणीस यांच्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये शाहरुखही सहभागी झाला होता. दरम्यान शाहरुख हातात क्लॅपबोर्ड घेऊन माध्यमांना पोज देताना दिसला. तसेच शाहरुख खान मुक्ताचा हात धरुन तिला स्टेजवर घेऊन जाताना दिसला. स्टेजवर येताच शाहरुखने मुक्ताच्या गालावर किसही केलेली दिसतेय. मुक्तासाठी शाहरुखबरोबरची तिची ही भेट नक्कीच अविस्मरणीय असेल यांत वादच नाही. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आणखी वाचा – घटस्फोटादरम्यान करवा चौथ केल्याबाबत नको नको ते बोलले, पण मानसी नाईकने अखेर दिलं स्पष्टीकरण, म्हणाली, “नव्या नवरीला…”

आज शाहरुखच्या वाढदिवसाची सोशल मीडियावर चांगलीच क्रेझ पाहायला मिळतेय. त्याचा वाढदिवस आणि त्याचा आगामी चित्रपट ‘डंकी’चा टिझरही सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. येत्या २२ डिसेंबरला ‘डंकी’ हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे.

Tags: entertainmentmarathi actressmukta barveshahrukh khanshahrukh khan birthday
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Sohail Khan Seema Sajdeh divorce Reason

“वाईट वातावरणामध्ये…”, सोहेल खानचा घटस्फोट का झाला?, पूर्वाश्रमीच्या पत्नीचा मोठा खुलासा, म्हणाली, “भांडणामध्ये…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.