उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अनेकदा चर्चेत येतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे, तर कधी त्यांच्या ड्रेसिंगमुळे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या अमृता नेहमीच त्यांच्या चाहत्यांसह रील्स व फोटोज शेअर करत असतात. त्याचबरोबर समाजात घडणाऱ्या विविध घटनांवर त्या प्रखरपणे मत मांडत असतात. कधी त्यांच्या पोस्टचं कौतुक होतं, तर कधी त्या ट्रोलर्स निशाण्यावर आलेल्या आहेत. असं असलं तरी, त्या ट्रोलर्सकडे फारसं लक्ष देत नाहीत. अशातच, अमृता यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. (Amruta Fadnavis viral Video in traffic)
नुकतंच अमृता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रील व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये त्या कारमध्ये बसून डान्स करताना दिसल्या. या व्हिडीओमध्ये त्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं दिसत असून यावेळी त्या ट्रॅफिकमध्ये अडकल्या असताना त्यांना ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरला नाही.
हे देखील वाचा – Video : बँड बाजा, सजावट, पाहुणे-कलाकारांची गर्दी अन्…; अमृताला लागली प्रसादच्या नावाची हळद, होणाऱ्या बायकोला उचलून घेतलं अन्…
अमृता या एका कार्यक्रमासाठी कारने जात होत्या. तेव्हा त्या काही काळ ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. यावेळी त्यांनी ट्रॅफिक जॅममधून वेळ काढत एका ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवला. यावेळी त्यांनी काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला असून त्यांच्या कानातले आणि अंगठी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओला त्यांनी “ट्रॅफिक जॅममध्ये थोडंसं मनोरंजन”, असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या व्हिडिओची एकीकडे चर्चा होत आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र या व्हिडीओवरुन त्यांना जोरदार ट्रोल केलं आहे.
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन, कारण अजूनही अस्पष्ट

एक नेटकरी यावर म्हणाला, “आता अमृता ताईंना रील्स बनवायचा नवा छंद जडला आहे. अरे देवा!”. तर दुसरा नेटकऱ्याने यावर कमेंट केली की, “हे काय आहे. मी चाललो मारायला आता.” आणखी एक नेटकरी यावर म्हणाला, “मी ५०० रुपये देतो. पण ही पोस्ट कृपा करून डिलिट करा.”. तसेच, अजून एक नेटकरी यावर म्हणाला, “परमेश्वर, देवेंद्र फडणवीस यांना अधिकाधिक सहनशक्ती प्रदान करो हीच प्रार्थना”. एकीकडे या व्हिडिओवर जोरदार ट्रोल होत असताना त्यांच्या चाहत्यांना मात्र हा व्हिडीओ आवडला. त्यांच्या या व्हिडीओवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला. एकूणच अमृता यांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आला आहेत.