मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलं आहे. ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या किशोरी यांनी आपल्या अभिनयाने ९०चं दशक गाजवलं आहे. केवळ अभिनेत्रीच नाही, तर त्या उत्तम नृत्यांगणा आणि सिने निर्मात्या देखील आहेत. इतकंच नव्हे, तर अनेक हिंदी चित्रपट व मालिकांमध्येही त्या झळकल्या आहेत. किशोरी शहाणे सोशल मीडियावरही खूपच सक्रिय असून त्या त्यांचे व्हिडीओ नेहमी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. असाच एक व्हिडिओ नुकताच त्यांनी शेअर केला, ज्याची चर्चा सध्या सुरु आहे. (Kishori Shahane cooking in her Farmhouse)
किशोरी शहाणे सध्या त्यांच्या फार्म हाऊसवर आहेत. तिथे त्या विविध भाज्यांची शेती करताना अनेकदा दिसतात. अशातच, त्यांनी त्या फार्महाऊसमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या चुलीवर जेवण बनवताना दिसल्या आहेत.
किशोरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या चुलीवर नाचणीची भाकरी बनवताना, तसेच तव्यावर मासे तळताना दिसत आहेत. तसेच “जेवण मस्त झालं आहे…” असं म्हणत त्यांच्या चाहत्यांना जेवणाला येण्याचं आग्रह त्यांनी केला आहे. हा व्हिडिओ त्यांचे पती दीपक विज यांनी बनवला आहे. तर शेअर करत त्या यामध्ये म्हणाल्या, “तुमचं चुलीवरच्या जेवणाबद्दल काय मत आहे? मासे आणि नाचणीची भाकरी…”. त्याचबरोबर हा व्हिडिओ बनवल्याबद्दल त्यांनी पती दीपक विज यांचे आभार मानले आहेत.
हे देखील वाचा – Video : दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली अलिशान कार, व्हिडिओ व्हायरल, कारची किंमत ऐकून व्हाल थक्क
किशोरी शहाणे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एक चाहती म्हणाली, “अरे मस्त, तुम्हाला तुमची आवडती डिश बनवताना पाहायला आम्हाला आवडेल… आणि मासे तर आमचा आवडता पदार्थ आहे.” तर दुसऱ्या चाहत्याने “तुमच्या घरी जेवणासाठी आम्ही कधी येऊ, हे सांगता का?” असं प्रश्न विचारताच त्या म्हणाल्या, “तुम्ही कधीही या.” अशी कमेंट केली आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.
हे देखील वाचा – स्वप्नील जोशीचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, पहिल्या चित्रपटाची केली घोषणा, म्हणाला, “आईचा आशीर्वाद…”

एक डाव धोबीपछाड, नवरा माझा नवसाचा, माहेरची साडी, मोरूची मावशी, दुर्गा झाली गौरी यांसारख्या नाटक व चित्रपटांमध्ये किशोरी यांनी काम केले आहेत. त्याचबरोबर त्या मराठी बिग बॉस मध्ये देखील सहभागी झाल्या होत्या. शिवाय, ‘ऐका दाजिबा’ या चित्रपटाची निर्मितीदेखील त्यांनी केली आहे. किशोरी शहाणे सध्या एका हिंदी मालिकेच्या शूटमध्ये व्यग्र असून चाहते त्यांना मराठी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.