मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून अभिनेता स्वप्निल जोशीला ओळखला जातो. स्वप्निलने आतापर्यंत अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयाबरोबरच तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असून त्याच्या अनेक फोटोज व व्हिडिओज नेहमी चर्चा होत असते. अभिनेत्याकडे सध्या अनेक चित्रपट असून त्याच्या शूटिंगमध्ये तो व्यस्त आहे. अशातच, त्याने अभिनयासह एका नव्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. (Swapnil Joshi produced a upcoming Movie)
‘नाच गं घुमा’ या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटातून स्वप्नील चित्रपट निर्मितीत क्षेत्रात उतरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘वाळवी’ फेम दिग्दर्शक परेश मोकाशी हे करणार आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणाला की, “काम करत असताना कलाकार म्हणून माझ्या निर्मात्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझ्या स्वप्नांना बळ दिलं. कदाचित म्हणूनच हे धाडस! मित्रांच्या मदतीने, सह-निर्माता म्हणून मी माझा एक नवीन प्रवास सुरु करत आहे. आईचा आशीर्वाद आहेच, तुमचा ही असुद्या!”, असा म्हणत त्याने या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर त्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील सांगितली.
हे देखील वाचा – ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद, प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं, “खूप बरं झालं कारण …”
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘वाळवी’, ‘आत्मपॅम्प्लेट’ यांसारख्या दर्जेदार सिनेमे देणारे दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा हा नवा चित्रपट महिलांवर आधारित आहे. ज्याचे लेखन मधुगंधा कुलकर्णी व परेश मोकाशी यांनी केलं आहे. त्याचबरोबर ते या चित्रपटाचे निर्माते देखील असून ते व स्वप्नीलसह मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील आदी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. दरम्यान, या चित्रपटात कोणते कलाकार असणार आहे? याची माहिती समोर आलेली नाही. पुढील महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२४ ला हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.
हे देखील वाचा – “आधी गाडी नीट चालवा”, मुग्धा व प्रथमेश यांनी ड्राइव्ह करताना गाणं गात बनवला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “चालत्या गाडीमध्ये…”
स्वप्नील अनेकदा त्याच्या कामासह वैयक्तिक आयुष्यातील फोटोज् व व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करताना दिसतो. नुकताच तो ‘इंद्रधनुष्य’चं लंडनमधील शूटिंग संपवून मुंबईत परतला आहे. त्यानंतर तो ‘जिलेबी’ चित्रपटात प्रसाद ओकसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर, परेश मोकाशींबद्दल बोलायचे गेल्यास, ‘वाळवी’नंतर ‘आत्मपॅम्प्लेट’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ज्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, काल मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी ‘सकाळी १० वाजता भेटूया’, अश्या आशयाची एक स्टोरी शेअर सोशल मीडियावर केली होती. तेव्हा चाहत्यांसह अनेकांना प्रश्न पडला होता. अखेर या चित्रपटाची घोषणा होताच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे.