रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठमोळा विनोदवीर संकेत भोसले व सुगंधा मिश्रा होणार आई-बाबा! फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून होतंय शुभेच्छांचा वर्षाव

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 15, 2023 | 7:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sugandha Mishra announces her Pregnancy

मराठमोळा विनोदवीर संकेत भोसले व सुगंधा मिश्रा होणार आई-बाबा!

हिंदी टीव्हीक्षेत्रातील जोडी संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा हे आपल्या विनोदी अंदाजामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अशातच या लोकप्रिय जोडप्यांनी त्यांच्या चाहत्यांसमोर एक आनंदाची बातमी शेयर केली आहे. सुगंधा व संकेत हे लवकरच आई-बाबा होणार आहे. या जोडीने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर करत ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. तसेच, ही बातमी येताच अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Sugandha Mishra announces her Pregnancy)

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी या जोडीने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. दोघांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मॅटर्निटी फोटोशूट केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री पती संकेत भोसलेसह एका समुद्रकिनाऱ्यावर पोज देताना दिसत आहे. यावेळी जांभळ्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस परिधान करताना सुगंधा तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली. तर गुलाबी शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये संकेत खूप सुंदर दिसत आहे.

हे देखील वाचा – चुलीवरची भाकरी अन् मासे… किशोरी शहाणे यांनी फार्महाऊसवर बनवलं खास जेवण, नेटकरी म्हणाले, “तुमच्या घरी जेवणासाठी…”

यावेळी हे फोटोज शेअर करताना ती म्हणाली, “लवकरच आमच्याबरोबर कोणीतरी येत आहे. आता आम्ही आमच्या या नव्या सदस्यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर असेच राहू द्या.” तिच्या या पोस्टवर गायिका नेहा कक्कर, अभिनेत्री भारती सिंग, गौहर खान, नकुल मेहता, किकू शारदा यांसारख्या अनेक कलाकारांनी अभिनंदन केले आहे. तसेच, त्यांची ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हे देखील वाचा – Video : दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली अलिशान कार, व्हिडिओ व्हायरल, कारची किंमत ऐकून व्हाल थक्क

View this post on Instagram

A post shared by Sugandhaa S Misshra (@sugandhamishra23)

सुगंधा आणि संकेत यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले. गेली अनेक वर्ष ही जोडी या क्षेत्रात सक्रिय असून दोघांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम केलेलं आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेला मराठमोळा विनोदवीर संकेत भोसले संजय दत्तच्या मिमिक्रीसाठी विशेष ओळखला जातो. तसेच, ही जोडी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून या जोडीचे अनेक मजेशीर व्हिडिओज नेहमीच व्हायरल होतात.

Tags: comediansanket bhosalesugandha mishraSugandha Mishra announces her Pregnancythe kapil sharma show
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg Boss 17 Grand Premiere

सलमान खानची एन्ट्री अन्…; 'बिग बॉस'च्या १७व्या सीझनची धमाकेदार सुरुवात, मराठमोळी अंकिता लोखंडेंसह 'हे' स्पर्धक सहभागी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.