सध्या सीआयडी ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. १९९८ ते २०१८ या कालावधीमध्ये या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. आता पुन्हा एकदा नव्याने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतील सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. ‘कुछ तो गडबड है’, ‘दया दरवाजा तोड दो’ असे अनेक संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. या मालिकेचा प्रोमोदेखील समोर आला आहे. यामध्ये आता दया जखमी अवस्थेत दिसून आला आहे. तसेच ही मालिका कधी येणार आणि कुठे बघायला मिळणार? याबद्दलदेखील माहितीदेखील देण्यात आली आहे. (CID new promo )
सोनी टीव्हीवर एक प्रोमो प्रदर्शित कला आहे. यामध्ये त्याच्या शरीरावर एक पट्टी बांधलेली दिसत आहे. तसेच तो म्हणतो की, “विरोधकांना वाटलं की मला मारणं खूप सोपं आहे , पण ते विसरले आहेत. त्यांच्या लक्षात आणून द्याव लागेल. परत येणार नाही इतका मी लांब गेलो नाही. तसेच जो सहज मरेल तो दया नाही”.
यावेळी दया गुंडांच्या मागे धावतो. तसेच नंतर आवाज येतो की ‘दया दरवाजा तोड दो’. या मालिकेच्या निमित्ताने शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव, दया शेट्टी पुन्हा एकदा धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र या तिघा कलाकारांव्यतिरिक्त अजून कोणते कलाकार दिसणार आहे? याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र प्रेक्षकवर्ग ही मालिका पाहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
२१ डिसेंबर रोजी ही मालिका सोनी एंटरटेनमेंट चॅनलवर शनिवार व रविवार रात्री १० वाजता प्रसारित केली जाणार आहे. जेव्हा सीआयडीचा शेवटचा एपिसोड दाखवण्यात आला तेव्हा अभिजीत व दया यांना गोळी लागल्याचे दिसून आले होते. ते दोघंही दरीत कोसळले होते. आता त्यापुढे काय झालं? आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. या प्रोमोआधी मुहूर्त पूजा करतानाचा व्हिडीओदेखील समोर आला होता. तसेच या मालिकेचे निर्माते बीपी सिंह यांनी चित्रीकरण सुरु झाल्याची अधिकृत माहिती दिली होती.