Abhijeet Kelkar On Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे निकाल समोर आले असून त्यानुसार मतदारसंघनिहाय निकाल जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. राज्यात २८८ विधानसभेच्या जागासाठी बुधवारी मतदान काही घटना वगळता शांततेत पार पडले आहे. या मतदानात राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. राज्यातील बहुमतांशी एक्झिट पोलनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असा अंदाज वर्तवलेला आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विधानसभेतून निवडून आले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांच्या विरुद्ध ते विजेते ठरले आहेत.
नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) सातत्यपूर्ण बालेकिल्ला आहे, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे प्रबळ उमेदवार ठरले. मतदानाच्या या पार्श्वभूमीवर आता कलाकार मंडळींनीही पोस्ट शेअर करायला सुरुवात केली आहे. नागपूर विधानसभेतून देवेंद्र फडणवीस विजेते होताच एका मराठमोळ्या अभिनेत्याने पोस्ट शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. हा मराठी अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर. अभिजीतने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – “खूप सारं प्रेम आणि…”, अमृता खानविलकरच्या वाढदिवसाला नवऱ्याची रोमँटिक पोस्ट, म्हणाला, “प्रगती करत राहा…”
छोट्या पडद्यावरील अनेक मालिका व चित्रपटामुळे अभिजीत प्रसिद्धीझोतात आला. ‘बिग बॉस’ मराठीमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. नेहमीच काही ना काही शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. बरेचदा न पटलेल्या मुद्द्यांवर तो स्पष्टपणे भाष्य करताना दिसतो. सोशल मीडियावरुन अनेकदा अभिनेता व्यक्त झालेला पाहायला मिळाला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर अभिनेत्याने खास पोस्ट शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
आणखी वाचा – आजारपणात अमोलला करावं लागलं टक्कल, प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकही भावुक, अप्पी-अर्जुनसाठीही कठीण काळ
अभिजीतने फोटो पोस्ट शेअर करत, “असंख्य काजव्यांच्या एकत्र येण्याने रात्रीचा काळोख कमी होत नाही. पौर्णिमेचा चंद्र जरी सौम्य असला तरी रात्र प्रकाशमय केल्याशिवाय राहत नाही”, असं म्हटलं आहे. तर या पोस्टला कॅप्शन देत त्याने “धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला देवेंद्र फडणवीसजी, आपलं मनापासून, त्रिवार अभिनंदन”, असं म्हणत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.