बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपासून ती अधिक चर्चेत आली होती. एका मौलवींबरोबरचा तिचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये तिचा लग्नानंतर बदललेल्या अवतारावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली होती. मात्र या सगळ्याला तिने सोशल मीडियाच्या माध्यामातून ट्रोलर्सना उत्तरदेखील दिले होते. अशातच आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्वराचा नवरा फाहाद अहमद यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अणुशक्ती नगर विधानसभा मतदार संघातून फहाद यांची हार झाली आहे. याबद्दल आता सविस्तरपणे जाणून घेऊया. (swara bhaskar husband on election)
महाराष्ट्रामध्ये २८८ विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. याचा आता अणुशक्ती नगर विधानसभेचा निकाल समोर आला आहे. या ठिकाणी नवाब मलिक यांची मुलगी सना मलिककडून फहाद अहमद यांचा पराभव झाला आहे. फहाद एनसीपीच्या (शरद पवार) तिकिटावर उभे होते. मात्र या ठिकाणी त्यांना यश मिळू शकत नाही. फहादचे अनेक मतांनी पराभव झाला आहे.
स्वरा भास्करचा नवरा आधी समाजवादी पार्टीमध्ये होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या एनसीपीमध्ये प्रवेश केला. यामधूनच ते विधानसंभेसाठी अणुशक्ती मतदार संघातून उभे राहिले होते. पण त्यांना हार पत्करावी लागली. दरम्यान स्वरा किंवा व तिच्या नवऱ्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
स्वरा २०२३ साली फहादबरोबर नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकली होती. सोशल मीडियाद्वारे तिने लग्नाची घोषणा करुन सगळ्यांनाच धक्का दिला होता. दोघांनाही आता एक मुलगी आहे. मुलीचे नाव त्यांनी राबीया असे ठेवले. लग्नानंतर स्वरा अभिनयापासून दूर असलेली बघायला मिळत आहे. अभिनयापासून दूर असली तरीही स्वरा सोशल मीडियावर अधिक सक्रिय आहे. ती नवऱ्याबरोबरचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच मुलगी राबीयाबरोबरचेदेखील अनेक फोटो शेअर करताना ती दिसते. सोशल मीडियावर अनेक ट्रोलर्सनादेखील सडेतोड उत्तर ती देत असते.