मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : एकमेकांना केक भरवला, सेलिब्रेशन अन्…; आदेश व सुचित्रा बांदेकरांच्या लग्नाला ३३ वर्ष पूर्ण, लेक सोहम म्हणाला, “तुमचा त्याग, कष्ट…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 14, 2023 | 4:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aadesh & Suchitra Bandekar celebrates 33rd Marriage Anniversary

Video : एकमेकांना केक भरवला, सेलिब्रेशन अन्...; आदेश व सुचित्रा बांदेकरांच्या लग्नाला ३३ वर्ष पूर्ण, लेक सोहम म्हणाला, "तुमचा त्याग, कष्ट..."

मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर. ही जोडी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असून सर्वत्र दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. आदेश हे ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचले आहे. तर सुचित्रा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. दोघांनी त्यांच्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. आदेश व सुचित्रा यांच्या प्रेमाचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. त्याचबरोबर, आदेश यांना जेव्हा अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. तेव्हा सुचित्रा या नेहमीच त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. (Aadesh & Suchitra Bandekar celebrates 33rd Marriage Anniversary)

आदेश व सुचित्रा यांच्या लग्नाला नुकतेच ३३ वर्ष पूर्ण झाले असून यावेळी काही मित्रमंडळांच्या उपस्थितीत त्यांच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडीओ नुकतंच इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये हे दोघे एकमेकांना केक भरवताना दिसत आहे. यावेळी अभिनेते सुमित राघवन, चिन्मयी सुमित, सचित पाटील व गायक अजित परब त्यांच्या पत्नी व मुलांसह हा क्षण साजरा करताना दिसतात. यावेळी सुमित राघवन यांनी या दोघांसाठी हिंदी गाणं गायलं होतं.

हे देखील वाचा – “पाडव्यालाही अशाच पोजमध्ये…”, ऐश्वर्या नारकरांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्रीचा संताप, म्हणाल्या, “यांच्या विचारांचं…”

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

आदेश यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून व्हिडीओच्या कॅप्शनला त्यांनी सर्वांचे आभार मानले आहे. आदेश यांचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी अभिनेत्री मानसी नाईक, क्षिती जोग, पंकज विष्णू, जयवंत वाडकर यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

हे देखील वाचा – सई ताम्हणकरने नव्या आलिशान घरातच आयोजित केला दिवाळी कार्यक्रम, मराठी कलाकारांची गर्दी अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

त्याचबरोबर लेक सोहम बांदेकर याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत त्याच्या आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “लग्नाच्या ३३व्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा आई-बाबा! ३३ वर्ष तुमचा त्याग, कठोर परिश्रम आणि निखळ प्रेमाचे. आता कदाचित मी लहान मूल होणार नाही, मात्र, मी स्वतःला लहान मूल समजतो. यामुळे मी या फोटोत आहे.”, असं सोहम या पोस्टमध्ये म्हणाला.

Tags: Aadesh & Suchitra Bandekar celebrates 33rd Marriage AnniversaryAadesh Bandekarsoham bandekarsuchitra bandekar
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Mitali Mayekar answers to netizens on her new car

"मर्सिडीज घ्यायची ना", मिताली मयेकरने नवी कार घेतल्यानंतर नेटकऱ्याने सुनावलं, अभिनेत्री म्हणाली, " माझा बजेट तेवढा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.