मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर. ही जोडी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असून सर्वत्र दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. आदेश हे ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचले आहे. तर सुचित्रा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. दोघांनी त्यांच्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. आदेश व सुचित्रा यांच्या प्रेमाचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. त्याचबरोबर, आदेश यांना जेव्हा अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. तेव्हा सुचित्रा या नेहमीच त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. (Aadesh & Suchitra Bandekar celebrates 33rd Marriage Anniversary)
आदेश व सुचित्रा यांच्या लग्नाला नुकतेच ३३ वर्ष पूर्ण झाले असून यावेळी काही मित्रमंडळांच्या उपस्थितीत त्यांच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडीओ नुकतंच इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये हे दोघे एकमेकांना केक भरवताना दिसत आहे. यावेळी अभिनेते सुमित राघवन, चिन्मयी सुमित, सचित पाटील व गायक अजित परब त्यांच्या पत्नी व मुलांसह हा क्षण साजरा करताना दिसतात. यावेळी सुमित राघवन यांनी या दोघांसाठी हिंदी गाणं गायलं होतं.
आदेश यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून व्हिडीओच्या कॅप्शनला त्यांनी सर्वांचे आभार मानले आहे. आदेश यांचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी अभिनेत्री मानसी नाईक, क्षिती जोग, पंकज विष्णू, जयवंत वाडकर यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
हे देखील वाचा – सई ताम्हणकरने नव्या आलिशान घरातच आयोजित केला दिवाळी कार्यक्रम, मराठी कलाकारांची गर्दी अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

त्याचबरोबर लेक सोहम बांदेकर याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत त्याच्या आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “लग्नाच्या ३३व्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा आई-बाबा! ३३ वर्ष तुमचा त्याग, कठोर परिश्रम आणि निखळ प्रेमाचे. आता कदाचित मी लहान मूल होणार नाही, मात्र, मी स्वतःला लहान मूल समजतो. यामुळे मी या फोटोत आहे.”, असं सोहम या पोस्टमध्ये म्हणाला.