मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध धाटणीचे अनेक कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात माय-लेकाचे नाते असो, किंवा वडील-लेकीचे. अश्याच एका वडील आणि लेकाच्या नात्यावर आधारित एक चित्रपट लवकरच येत आहे. ‘शॅार्ट अँड स्वीट’ असं या चित्रपटाचं नाव असून जो लवकरच सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. शुभम प्रोडक्शन या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होते. तर गणेश दिनकर कदम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर व टीझर समोर आले होते. त्यानंतर चित्रपटाची टीम ठिकठिकाणी चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच या चित्रपटाबाबत नुकतीच एक माहिती समोर आली आहे. (Short and Sweet marathi movie update)
‘शॅार्ट अँड स्वीट’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, रसिक सुनील आणि श्रीधर वत्सर आदी प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात दोन नवीन कलाकार रुपेरी पडद्यावर पदार्पण करताना दिसणार आहे. ते म्हणजे सोनाली कुलकर्णी यांचे आई व वडील. प्रथमच सोनाली त्यांच्या आई-वडिलांसह स्क्रीन शेअर करताना दिसणार असून याबाबतचा एक किस्सा त्यांनी शेअर केला.
हे देखील वाचा – “त्यांची तब्येत ढासळतेय, न्याय मागणीचा…”, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत हेमंत ढोमेचं वक्तव्य, म्हणाला, “महाराष्ट्र अशांत…”

‘शॅार्ट अँड स्वीट’ चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पुण्यात असल्याने सोनालीचे आई-वडील त्यांना भेटण्यासाठी सेटवर पोहोचले. तेव्हा बसमध्ये प्रवास करतानाच्या सीनचे शूट सुरु होते. यावेळी अभिनेत्रीचे आई-बाबा उपस्थित असल्याने चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी त्यांना अभिनय करण्याची संधी दिली. दिग्दर्शकांनी दिलेल्या संधीला मान देत अखेर त्यांनीही अभिनय करण्याची संधी दिली. या चित्रपटात सोनाली यांचे आई-वडील सहप्रवाशाच्या भूमिकेत झळकणार आहेत. यावेळी सोनालीच्या आई-वडिलांनी आपल्या लेकीबरोबर काम करण्याचा वेगळा आनंद झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. तर आपल्या आईबाबांसोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.
हे देखील वाचा – “झोपून घे बाई…”, सई लोकूरच्या व्हिडीओवर क्रांती रेडकरची कमेंट, म्हणाली, “तुला व तुझ्या येणाऱ्या बाळाला…”
आपल्या वडिलांना भेटण्याची तीव्र ओढ असलेल्या मुलासमोर एक व्यक्ती जेव्हा वडील म्हणून येतात. तेव्हा त्या मुलाची झालेली अवस्था, वडील म्हणून स्वीकारताना सुरु असलेली मनातील चलबिचल हे प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार. तसेच, इतक्या वर्षांपासून त्याच्या आईने वडिलांची ओळख का लपवून ठेवली आणि कारण कळल्यानंतर तो त्याच्या वडिलांना स्वीकारणार का? या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना यातून मिळणार आहे. येत्या ३ नोव्हेंबरपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.