रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“झोपून घे बाई…”, सई लोकूरच्या व्हिडीओवर क्रांती रेडकरची कमेंट, म्हणाली, “तुला व तुझ्या येणाऱ्या बाळाला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 31, 2023 | 2:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kranti redkar comment on sai lokur video

kranti redkar comment on sai lokur video

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर हिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. ती उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याचबरोबर ती छान नृत्यांगणाही आहे. तिने ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्वदेखील बरंच गाजवलं होतं. या कार्यक्रमामुळे तिला बरीच लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर पडल्यानंतर तिचा सिनेसृष्टीतील वावर बराच कमी झालेला दिसला. त्यानंतर तिने लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता लवकरच सई आई होणार आहे. तिच्या आयुष्यात एका चिमुकल्या गोंडस बाळाची एन्ट्री होणार आहे. सध्या सई हा काळ इन्जॉय करताना दिसत आहे. नुकताच तिचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. याचे फोटो व व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या व्हिडीओवर अभिनेत्री क्रांती रेडकरने कमेंट करत तिला एक सल्ला दिला आहे. (kranti redkar comment on sai lokur video)

सईच्या डोहाळ जेवणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.  सईच्या मैत्रिणींनी मॉर्डन अंदाजात डोहाळ जेवण आयोजित केलं होतं. या मॉर्डन सोहळ्यात सई देखील मॉर्डनरित्या तयार झाली होती. याचे फोटो व व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यातील एका व्हिडीओत सई तिचा हा काळ इन्जॉय करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला.

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

आणखी वाचा – वयाची ६५शी ओलांडल्यानंतर अनिल कपूर यांनी स्वतःमध्ये केले आहेत इतके बदल, संपूर्ण लूकच बदलला कारण…

सईने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह कलाकारांनीही लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. इतर कलाकारांसह अभिनेत्री क्रांती रेडकरनेही या व्हिडीओवर कमेंट करत तिला सल्ला दिला. क्रांती लिहिते की, ‘झोपून घे बाई भरपूर… तुला व तुझ्या येणाऱ्या छोट्या बाळाला खूप सारं प्रेम…’, अशी कमेंट करत तिने सईला या काळात भरपूर झोप घेण्याचं सूचवलं आहे. तिच्या कमेंटवर बऱ्याच नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – बाबांचं निधन, आईला कर्करोग अन्…; बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्याची झाली होती अशी अवस्था

एका नेटकऱ्याने लिहिलं की, ‘कारण नंतर अजिबात झोप मिळत नाही’, अशी मजेशीर कमेंट करत त्याने सईला दिलेल्या सल्ल्याचं कारण स्पष्ट केलं. तर दुसऱ्या नेटकऱ्यानेही तिच्या कमेंटवर स्वतःची सहमत दर्शवत, ‘खरी गोष्ट आहे’ असं लिहित हसण्याचा इमोजी पाठवला आहे.   

Tags: baby shower functionkranti redkarmarathi actresssai lokur
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Short and Sweet marathi movie update

सोनाली कुलकर्णी यांचे आई-वडील मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.