शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निरागस चेहरा, आगळीवेगळी हेअरस्टाईल अन्…; ‘या’ फोटोतील चिमुकल्याला ओळखलं का? आज आहे मराठीतील दिग्गज अभिनेता

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 15, 2023 | 9:44 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Sachin Pilgaonkar shares a childhood photo

निरागस चेहरा, आगळीवेगळी हेअरस्टाईल अन्...; 'या' फोटोतील चिमुकल्याला ओळखलं का? आज आहे मराठीतील दिग्गज अभिनेता

देशभरात काल बालदिन साजरा झाला. या दिवशी मराठी कलाविश्वात अनेक कलाकारांनी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करून चाहत्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराच्या लहानपणीची एक झलक पाहण्याची मोठी उत्सुकता असते. त्याप्रमाणे ही कलाकार मंडळी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत आपल्या जुन्या आठवणी सांगतात. अशात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर बालदिनानिमित्त काही जुने फोटोज शेअर केले, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Sachin Pilgaonkar shares a childhood photo)

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. पाच दशकांहून अधिक काळ ते या क्षेत्रात सक्रिय आहेत. बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सचिन यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ पासून ते ‘रणांगण’ सारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये ते दिसले आहेत. त्याचबरोबर, ‘शोले’, ‘नदिया के पार’ असे अनेक हिंदी चित्रपटही गाजले आहेत. अभिनयाबरोबरच दिग्दर्शक, गायक, संगीतकार, परीक्षक अश्या विविध भूमिका त्यांनी उत्तमरीत्या निभावल्या आहेत.

मनोरंजन क्षेत्रात वावरत असताना सचिन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ते याद्वारे विविध फोटोज व व्हिडीओज शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्याचबरोबर ते त्यांच्या कारकिर्दीतील जुने किस्सेदेखील त्यांच्या चाहत्यांना सांगतात. असाच एक जुना फोटो सचिन यांनी नुकतंच इंस्टाग्रामवर शेअर केला, ज्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसते.

हे देखील वाचा – दिवाळी पाडव्यानिमित्त हेमांगी कवीला नवऱ्याकडून मिळाली खास भेटवस्तू, फोटो पोस्ट करत म्हणाली, “आमच्या माणसाने…”

View this post on Instagram

A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar)

सचिन हे जेव्हा १० वर्षाचे होते, त्यावेळचे फोटोज त्याने चाहत्यांसह शेअर केलेत. ज्यामध्ये ते अगदी निरागस दिसत असून त्यांनी केलेल्या हेअरस्टाईलमध्ये ते एकदम वेगळे दिसत आहे. हे फोटोज शेअर करताना त्यांनी एक आठवण यावेळी सांगितली. ते या पोस्टमध्ये म्हणाले, “मी १० वर्षांचा असताना बालकलाकार म्हणून जवळपास ४० चित्रपट केले होते. चित्रपटाचा सेट हा माझ्यासाठी एखाद्या शाळेसारखा होता, जिथे मी खूप काही शिकलो. माझे बाबा मला एका फोटो स्टुडिओत घेऊन गेले आणि कामासाठी काही पोर्ट्रेट क्लिक करून घेतले. मला त्यावेळेस ही हेअरस्टाईल आवडली नव्हती, पण आता हे फोटो पाहणे अमूल्य आहे.”

हे देखील वाचा – “भाषेवरुन हिणावलं…”, मराठी नव्हे तर मारवाडी आहे जितेंद्र जोशी, अभिनेत्याचे मोठे भाष्य; म्हणाला, “महाराष्ट्रात जन्माला आलेला…”

View this post on Instagram

A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar)

सचिन यांचे लहानपणीचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले असून या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर अनेक नेटकरी देखील यावर कमेंट करत त्यांचे कौतुक करत आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “सर तुम्ही गोंडस होता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरही तोच गोंडसपणा आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “खरंच तुम्ही तेव्हा फार गोड होतात, आणि अजूनही अहात. हा माझा मार्ग एकला, चंदा और बिजली असे अनेक चित्रपट विसरू शकत नाही.”. एकूणच सचिन यांच्या बालपणीच्या फोटोजची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

Tags: childrens daymarathi actorsachin pilgaonkarSachin Pilgaonkar shares a childhood photo
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Shweta Ambikar New car

'मुलगी झाली हो' फेम 'या' अभिनेत्रीने घेतली नवी कोरी आलिशान गाडी, कुटुंबियांसह स्वतः ड्राईव्ह केलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.