Poonam Pandey Died at 32 : बॉलीवूड विश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेय हिच्या निधनाची बातमी समोर येत आहे. पूनम पांडेयला गर्भाशयाच्या कर्करोग झाला होता. नुकतीच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. पूनम पांडेच्या मॅनेजरने तिच्या निधनाच्या बातमीलं दुजोरा देत तिचे निधन झाल्याची बातमी खरी असल्याचे म्हटले आहे.
पूनम नुकतीच गोवा इथे एका कार्यक्रमासाठी गेली होती. तिच्या गोव्याच्या कार्यक्रमाचा एक व्हिडीओदेखील तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे पोस्ट केला होता. गोव्यात एका मोठ्या क्रूझवर कार्यक्रमानिमित्त गेली होती. यावेळी तिने खूप एन्जॉय केल्याचेदेखील पाहायला मिळत आहे. पुनमने शेअर केलेला हा व्हिडीओ तीन दिवसांपूर्वीचाच आहे. त्यामुळे तिच्या अचानक जाण्याच्या बातमीमुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.
पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “आजची सकाळ खूपच निराशाजनक आहे. सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, सगळ्यांची लाडकी पूनम पांडेला आपण गर्भाशयाच्या कर्करोगामुळे गमावलं आहे. आतापर्यंत तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तिने चांगली व प्रेमळ वागणूक दिली. या दुःखद काळात आमच्या गोपनीयतेचा तुम्ही आदर करा अशी विनंती करतो”.
दरम्यान, पूनमची ही पोस्ट पाहून सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला आहे. ही बातमी खोटी असूदेत असे तिचे चाहते सातत्याने कमेंट करत म्हणत आहेत. तर काहींनी ही बातमी खरी असल्याचं म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे. २०१३मध्ये ‘नशा’ या चित्रपटाद्वारे पूनमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ शोमध्येही ती झळकली. शिवाय सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. पूनमच्या निधनानंतर कलाकार मंडळीही हळहळ व्यक्त करत आहेत.