सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“किती छळत आहेस त्याला”, नवऱ्याचा हात हातात घेऊन उभ्या असलेल्या पूजा सावंतला बहीण असं का म्हणाली?, व्हिडीओही केला शेअर

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 2, 2024 | 9:28 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Pooja Sawant's sister shared a cute video with her husband siddesh chavan

"किती छळत आहेस त्याला", नवऱ्याचा हात हातात घेऊन उभ्या असलेल्या पूजा सावंतला बहीण असं का म्हणाली?, व्हिडीओही केला शेअर

‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. आपल्या सहजसुंदर अभिनयाने, निरागस हास्याने व मनमोहक सौंदर्याने पूजाने अनेकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा ही तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

नुकताच पूजाचा सिद्धेश चव्हाणबरोबर शुभविवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. याचे काही खास फोटो पूजाने तिच्या सोशल मीडियावरद्वारे शेअर केले आहेत. गेले काही दिवस पूजाच्या संगीत, हळदी तसेच लग्नाआधीच्या काही विधींचे फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. या फोटो व व्हिडीओना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला. अशातच तिच्या लग्नाच्या काही खास क्षणांनादेखील चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – “गावी पोहोचल्यानंतर…”, कित्येक वर्ष कुटुंबियांपासून दूर राहतात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम श्याम राजपूत, म्हणाले, “छत्रपती संभाजी नगरला…”

अभिनेत्री पूजा सावंतची बहीण रुचिरा सावंत आपल्या बहिणीच्या लग्नात फारच उत्सुक होती. फार हिरीरीने ती लग्नाच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेत होती. रुचिरा व पूजा या दोन बहिणींचा खास बॉण्ड लग्नाच्या प्रत्येक कार्यात दिसून आला. हळदी समारंभ सोहळ्यात या दोघींनी एकमेकींबरोबर धमाल मजा मस्ती केली. एकमेकींनी ‘रसिकाच्या लग्नात’ या गाण्यावर छान ठेकाही धरला. त्याचबरोबर दोघी या गोड क्षणी भावुकही झाल्याचे पाहायला मिळाले.

आणखी वाचा – ‘झलक दिखला जा ११’ शोचा ‘हा’ स्पर्धक ठरणार विजेता, महाअंतिम सोहळ्यापूर्वीच नाव समोर

अशातच नुकतीच पूजाच्या लग्नाची सत्यनारायण पूजा पार पडली. यावेळी पुजा व सिद्धेशने देवाच्या आशीर्वादाने त्यांच्या सुखी संसारासाठी देवाकडे प्रार्थना केली. याचे काही खास क्षण रुचिराने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. अशातच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये ती पूजाला “दिदी किती छळते आहेस गं त्यांना?” असं मस्करीत म्हणते. यावर पूजा सिद्धेशला “मी छळ करतेय का?” असं विचारते आणि पूजाने हे विचारताच सिद्धेशही रुचिरासह “हो” असं म्हणतो. दरम्यान, पूजा-सिद्धेश व रुचिरामधील हे गोड क्षण रुचिराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केले आहेत.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainment newsMarathi newspooja sawantruchira sawantsiddesh chavanपूजा सावंतमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीरुचिरा सावंतसिद्धेश चव्हाण
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Rakesh Poojary Death
Entertainment

अवघ्या तिशीत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मित्राच्या मेहंदीमध्ये नाचला, मित्रांसह मस्करी केली अन्…

मे 12, 2025 | 4:05 pm
Next Post
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding  : लेकाच्या लग्नात मुकेश अंबानींची अन्नसेवा, स्वत:च्या हाताने वाढले अन्न, अनंत व राधिकानेही घेतला सहभाग, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.