शुक्रवार, ऑगस्ट 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गावी पोहोचल्यानंतर…”, कित्येक वर्ष कुटुंबियांपासून दूर राहतात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम श्याम राजपूत, म्हणाले, “छत्रपती संभाजी नगरला…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 1, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Maharashtrachi hasyajtra fame Shyam Rajput talked about the struggle of living away from his family

"गावी पोहोचल्यानंतर...", कित्येक वर्ष कुटुंबियांपासून दूर राहतात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्याम राजपूत, म्हणाले, "छत्रपती संभाजी नगरला..."

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या शोने प्रत्येक कलाकाराला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. अशा अनेक कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता श्याम राजपूत. ‘खानदेशचा सपूत श्याम राजपूत’ अशी आपली एक वेगळी ओळख निर्माण करत श्याम यांनी प्रत्येकाच्या मनात आपली एक जागा निर्माण केली आहे. हजरजबाबीपणा, अचूक टायमिंग व वेगवान संवादफेक श्यामच्या अभिनयाची बलस्थाने आहेत.

श्याम राजपूत यांनी आजवर मालिका, चित्रपटांत काम केले आहे. तसेच सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पण श्याम राजपूत यांना त्यांच्या कुटुंबापासून व लहान मुलापासून लांब राहून ही कामे करत प्रेक्षकांचे मनोरंजन करावे लागत आहे. नुकतंच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात त्यांच्या या संघर्षाविषयी सांगितले. यावेळी त्यांना तुम्ही सध्या तुमच्या मुलगा, पत्नी व कुटुंबापासून लांब आहात, तर तुम्ही कुटुंबाला कसा वेळ देता? असा प्रश्न विचारण्यात  आला.

यावेळी श्याम राजपूत यांनी या प्रश्नाचे उत्तर देत असं म्हटलं की, “माझ्यासाठी शूटिंगचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. कारण आमचं हास्यजत्रेचं शूटिंग खूप उशिरापर्यंत चालतं आणि छत्रपती संभाजी नगरला जाणारी शेवटची ट्रेन मला पकडता येत नाही. मग मला हास्यजत्रेमधील श्याम बांगर त्याच्या गाडीने कल्याणल सोडतो. मग मी कल्याणवरुण जे काही मिळेल. ते पकडून नाशिक (द्वारका)ला जातो. तिथून मग मी गाडीने छत्रपती संभाजी नगरला पोहोचतो. मग तिथे एक-दोन दिवस राहिल्यानंतर पुन्हा मुंबईला यावं लागतं”.

आणखी वाचा – “एका आजाराशी झुंज…”, अनंत अंबानीला करायचं नव्हतं लग्न, लग्नापूर्वीच मोठा खुलासा, स्वतःच म्हणाला, “तिच्या कुटुंबाने मला…”

यापुढे ते असं म्हणाले की, “गावी पोहोचल्यानंतर भावाची दोन मुलं व माझा मुलगा अगदी गळ्यात येऊन पडतात.  तेव्हा सगळं काही संपून जातं. प्रवासामुळे मी एवढा थकलेला असूनही त्यांच्या मिठीमुळे मी माझा सगळा त्रास व थकवा विसरून जातो. बऱ्याचदा मी इतका थकलेला असूनही बऱ्याचदा घरी न् जाता क्रिकेट खेळायला जातो. क्रिकेट खेळून झाल्यानंतर मग मी घरी जातो”.

आणखी वाचा – अंबानी कुटुंबियांच्या कार्यक्रमात गाणारी रिहाना नेमकी आहे तरी कोण?, जगभरात रंगली चर्चा, तिची एकूण कमाई आहे तब्बल…

दरम्यान, श्याम सुंदर राजपूत यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या आधी अनेक विनोदी कार्यक्रमांमधून काम केले आहे. त्यांच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील अनेक भूमिका गाजत असून प्रेक्षकांनाही या भूमिका विशेष आवडतात.

Tags: entertainemnt newsmaharashtrachi hasy jatramarathi actorMarathi newsshyam rajputshyam Rajput interview
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
Next Post
Pooja Sawant's sister shared a cute video with her husband siddesh chavan

"किती छळत आहेस त्याला", नवऱ्याचा हात हातात घेऊन उभ्या असलेल्या पूजा सावंतला बहीण असं का म्हणाली?, व्हिडीओही केला शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.