‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत प्रेक्षकांशी आपली नाळ जोडणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. आपल्या मनमोहक हास्याने व सौंदर्याने पूजाने आपला एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पूजा तिच्या नवऱ्यासह ऑस्ट्रेलियाला गेली.
ऑस्ट्रेलियामध्ये पूजा नवऱ्यासह लग्नानंतरचे काही खास क्षण एन्जॉय करताना दिसली. पूजाचा नवरा हा मूळचा भारतातला असला तरी तो ऑस्ट्रेलियात कामानिमित्त राहतो. ऑस्ट्रेलियामध्ये पूजाने होळी, गुढीपाडवा व तिच्या नवऱ्याचा वाढदिवस साजरा केला असल्याचे पाहायला मिळाले. याचे काही खास क्षणदेखील तिने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले होते. अशातच अभिनेत्री आता पुन्हा भारतात परतली आहे.
आणखी वाचा – “तुला जेलमध्ये टाकेन”, जुई गडकरीला चाहतीकडून धमकी, अभिनेत्रीनेही दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “बघतेच मी…”
काल (२८ एप्रिल) रोजी पूजाची बाही रुचिरा सावंत हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये रुचिराने पूजा सावंत पुन्हा भारतात आल्याच्या निमित्ताने आनंद व्यक्त केला होता. या व्हिडीओमध्ये रुचिरा पूजाला तिचा ड्रायव्हर असंही म्हणते. रुचिरा पूजासाठी “Finally My Driver Is Back” (अखेर माझी ड्रायव्हर परत आली आहे) असं म्हणत आहे आणि बहीण भारतात परत आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदीच खुलून आला होता.
त्यामुळे पूजाच्या भारतात परत येण्याने तिच्या बहिणीसह पूजाच्या अनेक चाहत्यांनाही याचा आनंद झाला आहे. दरम्यान, पूजाच्या कामाबद्दल बोल्याचे झाले तर पूजाचा नुकताच मुसाफिरा हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला होता. अशातच आता पूजा भारतात परतल्यामुळे ती कोणता नवीन चित्रपट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार का? यांची तिचे चाहते वाट पाहत आहेत.