मराठी मनोरंजन विशावतील अनेक कलाकार मंडळी ही प्राणीप्रेमी आहेत. अनेक कलाकारांकडे कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी आहेत आणि या प्राण्यांची ही कलाकार मंडळी अगदी एखाद्या व्यक्तीप्रमाणे जपणूक करतात. अशाच काही कलाकारांपैकी एक लोकप्रिय कलाकार म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ. निवेदिता सराफ यांच्या घरी एक पेट आहे आणि याचे टोपण नाव सनी आहे. सनी त्यांच्या कुटुंबाचाच एक सदस्य आहे. म्हणून निवेदिता सराफ नेहमी त्यांच्याबरोबरचे खास फोटो व व्हिडीओ शेअर करतात. अशातच नुकताच त्याचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसानिमित्त निवेदिता यांनी खास सेलिब्रेशनदेखील केले.
निवेदिता सराफ प्राण्यांवर खूप प्रेम करतात हे सगळेच जाणतात. अशातच त्यांनी सनीच्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत निवेदिता सराफ, अशोक सराफ व सनी पाहायला मिळत आहेत. सनीच्या वाढदिवसानिमित्त त्याला डोक्यात टोपी आणि घरी खास डेकोरेशन केलेलं पाहायला मिळत आहे. ‘हॅप्पी बर्थडे सन्नी’ असं डेकोरेशन करत त्यांनी आपल्या पेटचा वाढदिवस साजरा केला आहे. यावरूनच अशोक सराफ व निवेदिता सराफ यांनी त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केलेला दिसत आहे.
आणखी वाचा – Video : लग्नानंतर नवऱ्यासह ऑस्ट्रेलियात धमाल, आता भारतात परतली पूजा सावंत, व्हिडीओ चर्चेत
निवेदिता या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्या चाहत्यांबरोबर चित्रपट, मालिकांबद्दलच्या अनेक खास आठवणी, किस्से व फोटो शेअर करत ते त्यांच्या संपर्कात राहत असतात. निवेदिता यांनी अनेकदा त्यांच्या पेटबरोबरचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच त्यांनी वाढदिवसानिमित्त शेअर केलेला हा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – “तुला जेलमध्ये टाकेन”, जुई गडकरीला चाहतीकडून धमकी, अभिनेत्रीनेही दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “बघतेच मी…”
दरम्यान, निवेदिता सराफ या सोशल मीडियावरुन कायमच फोटो-व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या या फोटो-व्हिडिओला चाहत्यांकडून अनेक लाईक्स व कमेंट्स येत असतात. अशातच निवेदिता यांनी शेअर केलेल्या सनीच्या वाढदिवसाच्या फोटोलादेखील चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया देत प्रतिसाद दिला आहे. कलाकार मंडळींसह अनेक चाहत्यांनी तीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.