आपल्या सहजसुंदर अभिनयाने व मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. याचबरोबर सिनेसृष्टीत पूजा ही ‘कलरफूल’ या नावानेदेखील चांगलीच लोकप्रिय आहे. अभिनेत्री तिच्या हटके फोटोमुळे कायमच चर्चेत असते. अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणबरोबरचा फोटो शेअर करत तिच्या रिलेशनविषयी सांगितले. तिचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांसह अनेकांना धक्का बसला होता.
पूजाने सुरुवातीला सिद्धेशबरोबरचे पाठमोरे फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे पूजाचा बॉयफ्रेंड नक्की कोण याविषयी सर्वांनाच उत्सूकता लागली होती. त्यानंतर काही दिवसांनी स्वत: अभिनेत्रीने त्याच्याबरोबरचे अनेक फोटो शेअर करत त्याच्याविषयी खुलासा केला. त्यामुळे दोघांच्या नात्याविषयी सर्वांनाच माहीत झाले. त्यानंतर पूजा तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या कुटुंबासह फिरायला गेली होती. याचे काही खास फोटोही तिने चाहत्यांबरोबर शेअर केले होते.
अशातच पूजाने नुकतीच तिच्या आगामी चित्रपटाच्या म्युजिक लॉंच सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्याला पूजाने काळ्या रंगाच्या ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. तसेच या सोहळ्यात ती येताच पापाराजींनी तिला तिच्या रिलेशननिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी तिला “जीजू कुठे आहेत?” असा प्रश्नही तिला विचारण्यात आला. यावर ती “जीजू लवकरच येणार आहेत. मलाच भेटू देत” असं लाजून म्हणाली. या व्हिडीओमध्ये पूजा खूपच आनंदी दिसत आहे.
दरम्यान, ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर अभिनेता आणि निर्माता म्हणून काम केल्यानंतर पुष्कर जोग आता ‘मुसाफिरा’ चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.