सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आत्महत्येची भीती दाखवतो…”; शशांक केतकरचे मंदार देवस्थळीवर आरोप, व्हिडीओ शेअर केला अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 6, 2026 | 11:22 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shashank Ketkar Slammed Mandar Devsthali

शशांक केतकरचे मंदार देवस्थळीवर आरोप

Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने नुकतीच एक पोस्ट शेअर करत निर्मात्याने पैसे थकवल्याचा आरोप केला होता. तसेच, शशांकने पोस्ट करुन त्या निर्मात्याला इशाराही दिलेला. मात्र, पोस्टमध्ये शशांकने कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. अशातच अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट करुन निर्मात्याचे नाव घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच, निर्मात्यासोबत झालेल्या संभाषणाचे काही स्क्रिनशॉर्ट्सही शेअर केले आहेत. तर आता त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर करत निर्मात्याविरोधात थेट पोलीस कारवाई करण्याची धमकी दिली आहे.

आणखी वाचा: पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीवरुन जय दुधाणेला अटक, प्रतिक्रिया देत म्हणाला, “हनिमूनसाठी जात असताना…”

‘हे मन बावरे’ या मालिकेचे निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकबाकीचा आरोप करत शशांक केतकरने हा व्हिडीओ शेअर केला. तर नुकताच आणखी एक व्हिडीओ शेअर करत तो म्हणाला, “‘हे मन बावरे’ या मालिकेसाठी मी काम केलं त्याच्या मोबदल्यात मला फक्त त्रास मिळाला. हा व्हिडीओ मी फक्त माझ्यासाठी करत आहे. मंदार देवस्थळी यांनी एक युट्युब चॅनेलवर मुलाखत दिली होती, त्यात त्यांनी पुढच्या ६ महिन्यात सगळ्यांचे पैसे देऊन टाकेन असं त्यांनी सांगितलं होतं, याला आता चार वर्षे झाली. मी जेव्हा पहिल्यांदा या मुद्द्यावरून आवाज उठवला होता, तेव्हा काही सिनियर कलाकारांनी मला बरेच सल्ले दिले होते. पैसे नाही दिले म्हणून त्याच्या विरोधात असं बोलणं चुकीचं आहे, असं बरंच काही सांगितलं गेलं होतं. तुम्हाला जर त्यांच्याबद्दल पुळका असेल तर तुम्ही सगळ्यांनी एक-एक लाख रुपये जमा करून त्याला द्या. मंदार देवस्थळीसारखा उत्कृष्ट दिग्दर्शक इंडस्ट्रीत फार कमी आहेत. पण आम्ही केलेल्या कामाचे पैसे अजूनही त्याने दिलेले नाहीत. तो वेगवगेळ्या पद्धतीने इमोशनल करतो. कधी आत्महत्येची भीती घालतो, तर कधी बायको-मुलांची भीती घालतो. ज्यांचे पैसे बुडवले आहेत त्यांना देखील आत्महत्येचे विचार येऊ शकतात.” (Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali)

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

तर पुढे तो म्हणाला, “कृपा करून पैसे वेळेत दे. मतदान आणि आचारसंहिता लागू असल्यामुळे मी आता तक्रार केलेलं पात्र दळवी शकत नाही. पण ते देखील माझ्याकडे तयार आहे. माझी अशा आहे की तो लवकरात लवकर पैसे देईल. आजवर इतक्या तारखा देऊन कोणतीही तारीख पाळलेली नाही.” असं म्हणत शशांक केतकरने संताप व्यक्त केला आहे. दरम्यान पुढचा व्हिडीओ हा कागद्पत्रणासकट असेल असं देखील त्याने म्हटलं आहे. (Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali)

आणखी वाचा: “निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा…”, पैसे थकबाकी प्रकरणावर शशांक केतकरची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला, “एकही तारीख पाळली नाही आणि…”

Tags: entertainmentmandar devasthalimarathi actorshashank ketkarShashank Ketkar Angry PostShashank Ketkar Slammed Mandar Devsthali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Bigg Boss Marathi 6

'बिग बॉस मराठी ६' मध्ये 'या' स्पर्धकांची एंट्री?; 'चला हवा येऊ द्या' मधील विनोदवीर ते लावणी नृत्यांगना, स्पर्धकांची यादी जवळपास निश्चित

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.