Paru Marathi serial : मालिकाविश्वातील मनोरंजक ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांचं मन जिंकतात. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार? नवा ट्विस्ट काय असेल? हे सर्व प्रश्न प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतात. दरम्यान ‘झी-मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. ‘पारू’ ही मालिका सुरु झाल्यापासून रसिकांच्या मनात घर करतेय. या मालिकेतील पात्र आणि कथानक साऱ्यांना आवडू लागलं आहे. मालिकेत पारू आणि आदित्यच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. मात्र सध्या मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे.
मालिकेत पारू आणि आदित्य यांच्या लग्नाचं लपवलेलं सत्य अखेर अहिल्यादेवी किर्लोस्करांसमोर आलं आहे. आणि ही बातमी ऐकताच अहिल्यादेवींच्या राग अनावर झालेला पाहायला मिळाला आहे. मालिकेत आहिल्यादेवी सत्य समजताच आदित्य आणि पारूला घराबाहेर काढतात, ज्यामुळे आदित्य आणि पारू त्यांच्या नव्या संसाराची सुरुवात करताना दिसणार आहेत. दरम्यान झी-मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नवा प्रोमो शेअर केला आहे.
आणखी वाचा – लग्नाच्या चार वर्षांनी कतरीना कैफ-विकी कौशल होणार आई-बाबा, ४२व्या वर्षी अभिनेत्री गरोदर
यात आहिल्यादेवीने आदित्य-पारूला घराबाहेर काढलेलं ऐकताच प्रीतमला मोठा धक्का बसतो. संतापलेला प्रीतम अहिल्यादेवीला खूप काही सुनावताना दिसतो. “तुझ्या स्वार्थामुळे आम्ही या घराच सुख गमावलं आहे. आम्ही आदित्य-पारूला गमावलं आहे”, असं तो रागारागात म्हणताना दिसतो. ज्यामुळे रागाच्या भरात प्रीतम प्रियाला घेऊन घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतो आणि म्हणतो,”जिथे माझा दादा असेल तिथेच आम्हीही राहू. आम्हाला या किर्लोस्कर घरात राहायचं नाही”.
आणखी वाचा – Zubeen Garg Funeral : झुबीन गर्गला शेवटचं पाहायला चाहत्यांची तुडुंब गर्दी, डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ समोर
हे ऐकल्यावरही आहिल्यादेवी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. पारू-आदित्य पाठोपाठ प्रीतम-प्रियाही किर्लोस्कर कुटुंब सोडून जातात. आता मालिकेत पुढे आदित्य आणि पारू काय करणार?, कुठे राहायला जाणार? आणि त्यांच्या मागोमाग प्रीतम आणि प्रिया देखील कोणता निर्णय घेणार? आणि आहिल्यादेवी पारू आणि आदित्यचा स्वीकार करेल का?, हे सारं काही येत्या काही दिवसांत मालिकेत पाहणं रंजक ठरणार आहे.





