बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“विचित्र हावभाव करणं, कसंही नाचणं…”, स्त्री व्यक्तिरेखेबाबत सागर कारंडे स्पष्टच बोलला, म्हणाला, “कुठे पदर सरकला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 23, 2025 | 4:31 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
 Sagar Karande Actor

"विचित्र हावभाव करणं, कसंही नाचणं…", स्त्री व्यक्तिरेखेबाबत सागर कारंडे स्पष्टच बोलला, म्हणाला, "कुठे पदर सरकला…"

 Sagar Karande Actor : सिनेविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आजवर स्त्री व्यक्तिरेखा साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. पुरुषांनी साकारलेल्या या स्त्री व्यक्तिरेखा आजही अनेकांना ज्ञात आहेत. चित्रपट, मालिका, विनोदी शोमध्ये साकारलेल्या या कलाकारांची स्त्रीपात्र साऱ्यांना वेडं करणारी आहेत. आजवर सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुबोध भावे, वैभव मांगले, विजू खोटे या कलाकारांनी स्त्री व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या या भूमिकांचं नेहमीच कौतुक होताना पाहायला मिळालं आहे. याशिवाय चला हवा येऊ द्या या मालिकेत भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे या कलाकारांनीही स्त्रीपात्र साकारली.

पण पुरुषाने स्त्रीपात्र साकारताना स्त्रियांच्या कोणत्याही भावना दुखावल्या नाही पाहिजेत म्हणून योग्य ती काळजी घ्यायला हवी. आणि याच विषयावर अभिनेता सागर कारंडेने सविस्तर भाष्य केलं आहे. सागर कारंडेने आजवर त्याच्या विनोदी अंदाजाने रसिकांच्या मनात घर केलं आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सागर कारंडेने स्त्रीपात्राबाबत भाष्य केलं आहे. यावेळी अभिनेत्याने स्त्री व्यक्तिरेखा साकारताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याबाबत सांगितलं आहे.

आणखी वाचा – आदित्य-पारूपाठोपाठ प्रिया-प्रीतमही घराबाहेर, अहिल्यादेवी मोठा निर्णय घेणार का?, ‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट

सागर कारंडेने म्हटलं की, “पुरुष कलाकारानं स्त्री व्यक्तिरेखा साकारताना कोणत्याही प्रकारे त्यांचा अपमान होणार नाही, हे डोक्यात आणि मनात फिट बसवलं पाहिजे. कसंही नाचणं, उड्या मारणं, वाकडेतिकडे हातवारे करणं, विचित्र हावभाव करणं म्हणजे स्त्री व्यक्तिरेखा साकारणं असं नसतं. ती व्यक्तिरेखा साकारताना त्या कलाकाराला भारी वाटलं पाहिजे, साडी सांभाळणं हे माझ्यासमोर मोठं आव्हान होतं, साडी नेसल्यावर नीटनेटकं वावरणं आवश्यक असतं”.

आणखी वाचा – Zubeen Garg Funeral : झुबीन गर्गला शेवटचं पाहायला चाहत्यांची तुडुंब गर्दी, डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ समोर

पुढे तो म्हणाला, “कुठे पदर सरकला आहे, पोट दिसतंय, हे होता कामा नये. दुसऱ्या बाईली ती व्यक्तिरेखा पाहताना छान वाटलं पाहिजे, हे माझं ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमासाठी ध्येय असायचं. वावरण्यात महिलांप्रमाणे सहजता यावी म्हणून मी आई आणि पत्नीचं निरीक्षण करायचो, कारण मी साकारलेली स्त्री माझी मुलगी पाहणार होती. तिच्यापर्यंत ते सन्मानपूर्वकच पोहोचलं पाहिजे, असा माझा विचार होता”.

Tags: entertainmentmarathi actorSagar Karande Actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
71st national awards

71st national awards : शाहरुख खान आणि रानी मुखर्जीचा पहिला नॅशनल अवॉर्ड, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.