Poiticians on Saif Ali Khan Attacked : सिनेसृष्टीत सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यामुळे खळबळ माजली आहे. सैफ अली खानवर अज्ञाताकडून झालेल्या हल्ल्यामुळे चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण पाहायला मिळत आहे. बांद्रा येथील राहत्या घरी सैफ अली खानवर हा हल्ला झाला. त्याच्या घरात घुसून एका चोराने त्याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेता सैफ जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर अभिनेत्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या अभिनेत्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर मनोरंजन क्षेत्राबरोबरच आता राजकीय वर्तुळातून देखील या घटनेबद्दल प्रतिक्रिया समोर येत आहेत.
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करीत लिहिले, “अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चोरट्याने चाकू हल्ला केल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. ते लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा! पण या हल्ल्याच्या निमित्ताने राज्यातील गुन्हेगारी कोणत्या स्तराला गेली, हे दिसून येतं. खून, खंडणी, चोरी हे गंभीर गुन्हे सर्रास घडत असून मुंबईत वांद्रे सारख्या भागातही सुरक्षित वातावरण नाही, हे चिंताजनक आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाचं काय? सरकार गंभीर होऊन या गुन्हेगारीला समूळ उखडून टाकणार की नाही, हा खरा प्रश्न आहे”.
आणखी वाचा – सैफ अली खानच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज समोर, मोलकरणीवर संशय, पोलिसांना नक्की काय दिसलं?
अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चोरट्याने चाकू हल्ला केल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. ते लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 16, 2025
पण या हल्ल्याच्या निमित्ताने राज्यातील गुन्हेगारी कोणत्या स्तराला गेली, हे दिसून येतं. खून, खंडणी, चोरी हे गंभीर गुन्हे सर्रास घडत असून मुंबईत वांद्रे सारख्या…
तर खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. मुंबई असो, बीड असो किंवा परभणी सगळीकडे कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पंतप्रधानाचं आगतस्वागत, निवडणूक, शिबीरं यामध्ये सरकार गुंतून पडलं आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तो मोठा कलाकार आहे. बुधवारी पंतप्रधान मुंबईत होते, सगळी सुरक्षा तिकडे असणार. पंतप्रधान मुंबईत असले तरीही महाराष्ट्रात काय चाललं आहे हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारला पाहिजे”.
आणखी वाचा – सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा करीना कपूर खान बहिणींबरोबर करत होती पार्टी, फोटोमध्ये दिसलं सत्य
सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव *#तैमुर* ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते.ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे ? या दिशेने ही तपास होणे… pic.twitter.com/9atYhziAtl
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 16, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाबाबत केलेलं वक्तव्य लक्षवेधी ठरत आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे?, या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे. कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता, वार हा जीवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्या पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे हे विशेष”.