बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरात घुसून सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला आहे. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची बातमी समोर येताच बॉलिवडून विश्वात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सैफची मुलं ज्या खोलीत झोपलेली त्यात खोलीत चोर उडी मारुन आला होता. चोराची चाहूल सैफला जाग आली आणि तो बाहेर आला. त्यामुळे आपण पकडले जाऊ या भीतीने चोराने सैफवर हातात असलेल्या धारदार शस्त्राने वार केले. (son Ibrahim hospitalized to saif ali khan)
सैफ अली खान चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, सैफचा मुलगा इब्राहिम अली खान याच्या लक्षात आले की त्याची एकही गाडी ताबडतोब हॉस्पिटलला जाण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत त्यांनी वेळ न घालवण्याचा निर्णय घेतला आणि सैफला ऑटोरिक्षात बसवून लीलावती रुग्णालयात नेले. तुम्हाला सांगतो की, सैफच्या घरापासून लीलावती हॉस्पिटल फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे.
अशातच करीना कपूरचा काल (बुधवार) रात्रीचा एक व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतरचा आहे. ज्यामध्ये करीना काही लोकांशी बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये करिनाच्या मागे एक ऑटो रिक्षा दिसत आहे. या ऑटोरिक्षातून इब्राहिमने सैफला हॉस्पिटलमध्ये नेले असावे, अशी शक्यता आहे. सैफ अली खानवर तातडीनं शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती आहे. मात्र, तो अजून शुद्धीवर आला नसल्याची माहिती आहे. सैफ अली खान शुद्धीवर आल्यानंतर पोलीस त्याचा जबाब घेतील.
धारदार शस्त्रानं सैफ अली खानवर सहावेळा वार करण्यात आला. त्यापैकी दोन वार त्याच्या शरीरावर लागल्याची माहिती आहे. सैफ अली खानवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचची टीम सैफ अली खानच्या घरी पोहोचली. फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी सैफच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे