शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पती पराग त्यागीसह संपूर्ण कुटुंबियांना मोठा धक्का बसला. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. पराग मात्र अजूनही या सगळ्यामधून सावरलेला नाही. काही दिवसांपूर्वीच त्याने शेफालीबाबत पोस्ट शेअर केली. तसेच तिचं कौतुक करत भावनांना वाट मोकळी करुन दिली. इतकंच काय तर पराग व शेफाली त्यांचा पाळीव श्वान सिंबासह राहत होते. सिंबा त्यांच्या मुलासारखाच आहे. त्यालाही शेफालीच्या जाण्याने मोठा धक्का बसला. परागने सिंबासह गरजूंना मदत केली. शेफालीच्या आठवणीत त्याने हे करायचं ठरवलं. मात्र सतत फोटो, व्हिडीओ शेअर करण्यावरुन पराग ट्रोल होत आहे. याला आता त्याने सडेतोड उत्तर दिलं आहे. (parag tyagi shefali jariwala)
शेफालीबरोबरची प्रत्येक आठवण पराग सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. याचवरुन कित्येकांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं. मात्र परागला ते पटलं नाही. बरेच दिवस शांत बसल्यानंतर त्याने कमेंट्सच्या माध्यामातून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. परागने नुकताच शेफालीचा हात हातात घेतलेला एक व्हिडीओ शेअर केला. यावर कित्येकांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्याची समजूत काढली. तर काहींनी हे नाटक असल्याचं म्हटलं.
आणखी वाचा – लग्नाच्या काही दिवसानंतरच हिना खान आणि नवऱ्यामध्ये भांडण?, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “तड़पाओगे…”
नकारात्मक कमेंट्स पाहून पराग म्हणाला, “शेफालीच्या निधनानंतर इतक्या लवकर मी पोस्ट करायला नको होतं असं कित्येक जण मला म्हणत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की, मी तुमच्यासारखा नाही. परीला सोशल मीडियाचा वापर करणं अधिक आवडायचं. या माध्यमाद्वारे तिला जे प्रेम मिळायचं त्यामध्ये ती खूप खूश असायची. त्या तुलनेत मी सोशल मीडियाचा अधिक वापर करत नाही”.
पुढे पराग म्हणाला, “आता ती माझ्या हृदयात आहे. तिला नेहमीच सगळ्यांचं प्रेम मिळत राहिल याची काळजी मी घेत आहे. ती आजूबाजूला दिसत नसली तरी सोशल मीडियावर कायम दिसत राहणार. हे सोशल मीडिया अकाऊंट फक्त तिच्यासाठी आहे. तिच्या गोड आठवणी मी चाहत्यांसह शेअर करु इच्छितो. तुमचे सारखे नकारात्मक लोक काय बोलतात याचा मला काहीही फरक पडत नाही. जे शेफालीवर प्रेम करतात, यापुढेही करत राहतील त्यांचीच मला काळजी आहे. तिच्या आठवणी मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करत राहीन”. परागने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं.





