बॉलिवूडमधील कलाकार मंडळींचं अफेअर, लग्न, प्रेग्नंसी याबाबत अनेकांना बरीच उत्सुकता असते. बी टाऊनमध्ये त्याची बरीच चर्चाही रंगताना दिसते. अभिनेत्रींची प्रेग्नंसी तर चर्चेचा विषयच ठरतो. लग्नापूर्वीच गरोदर असलेल्या अभिनेत्रींना तर ट्रोलिंगचा बराच सामना करावा लागला आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे नेहा धुपिया. नेहाने २०१८मध्ये अंगद बेदीसह थाटामाटात लग्न केलं. पण लग्नापूर्वीच ती गरोदर होती. यावरुन तिला बरंच हिणवलं गेलं. नेहाला याबाबत बराच त्रास सहन करावा लागला. याचविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं आहे. तसेच समाजाने तिच्याकडे कशा नजरेने पाहिलं? याबाबत संवाद साधला. (Neha dhupia pregnancy)
द हॉलिवूड रिपोर्ट इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नेहाने तिच्या प्रेग्नंसीबाबत अनेक खुलासे केले. सोहा अली खान नेहाची जवळची मैत्रीण आहे. नेहाच्या प्रेग्नंसीबाबत सर्वात आधी तिलाच माहित होतं. मात्र नेहाने सोहाला लग्नाला बोलावलं नाही. याचविषयी नेहा म्हणाली, “त्यावेळी सगळं काही विस्कटलेलं होतं. मी स्वतः गरोदर होती. तिला मी लग्नाला बोलावलं नाही. पण माझ्या प्रेग्नंसीबाबत निवडक लोकांना माहित होतं. त्या लोकांमध्ये सोहा होती”.
पुढे नेहा म्हणाली, “सोहालाच सर्वप्रथम कळालं की, मी गरोदर आहे. सोहा व कुणाल खेमुच्या रेस्टॉरंटमध्ये मी जेवत होते. त्याचदरम्यान मला चक्कर आली. दुसऱ्या दिवशी सकाळी सोहा व कुणाल आम्ही पुन्हा भेटलो. तेव्हा त्यांना मीच गरोदरपणाबाबत सांगितलं. जेव्हा मी गरोदर होते तेव्हा अंगद आणि मी एकमेकांना डेट करत होतो. तेव्हा आमचं नातंही अगदी नवीन होतं”.
आणखी वाचा – लग्नाच्या काही दिवसानंतरच हिना खान आणि नवऱ्यामध्ये भांडण?, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “तड़पाओगे…”
“आई-वडिलांपेक्षा प्रेग्नंसीबाबत मित्र मंडळींना सांगणं आमच्यासाठी अधिक सोयीस्कर होतं. काही मित्र-मंडळींना अलिकडेच मुलं झाली आहेत. मुलांना सांभाळणं अगदी कठीण काम आहे. लग्नाआधी गरोदर होतीस म्हणून तुम्ही लग्न केलं का?, खरंच तुम्हाला एकत्र राहायचं होतं का? असे अनेक प्रश्न मला विचारले जातात. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि खूप चांगलं राहत आहोत”. मे २०१८मध्ये नेहा व अंगदचं लग्न झालं. नोव्हेंबरमध्ये तिला मुलगी झाली. मेहरा असं तिचं नाव आहे. नेहा व अंगदला तीन वर्षाचा मुलगाही आहे.





