शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आलिशान घर, महागड्या गाड्या अन्…; इतक्या कोटी रुपयांची संपत्ती मागे ठेऊन गेले गझल गायक पंकज उदास, मुंबईतील ‘या’ ठिकाणी आहे घर

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 26, 2024 | 6:51 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Pankaj Udhas know the net worth of singer see the details

आलिशान घर, महागड्या गाड्या अन्...; इतक्या कोटी रुपयांची संपत्ती मागे ठेऊन गेले गझल गायक पंकज उदास, मुंबईतील 'या' ठिकाणी आहे घर

हिंदी मनोरंजन सृष्टीतून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे आज म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. पंकज यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. पंकज उधास यांनी ‘ना कजरे की धार’, ‘चिठ्ठी आयी है’, ‘चंदी जैसा रंग है तेरा’ यांसह अनेक लोकप्रिय गाण्यांना आपला आवज दिला. मात्र त्यांचा हा प्रवास इतका साधा व सोपा नव्हता. पंकज यांनी कठोर परिश्रम करत आपले स्थान मिळवले आहे. चला तर जाणून घेऊयात पंकज उधास यांच्या जीवनप्रवासाबद्दल.

पंकज उधास यांचा जन्म १५ मे १९५१ रोजी गुजरातमधील जेतपूर या ठिकाणी झाला. तीन भावांपैकी पंकज हे सर्वात लहान होते. त्याचा मोठा भाऊ मनहर उधास हेदेखील बॉलिवूड चित्रपटांमध्ये गझल गायक आहेत. तर त्यांचे दुसरे मोठे भाऊ निर्मल उधास हेदेखील एक प्रसिद्ध गझल गायक आहेत. पंकज यानं लहानपणापासूनच संगीताची आवड होती. वयाच्या अवघ्या ७ वर्षापासूनच त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. सुरुवातीला फक्त छंद म्हणून ते गायचे, पण त्यांच्या गायनाची प्रतिभा त्यांच्या भावाने ओळखली आणि त्यांना कार्यक्रमांमध्ये गाण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि मग त्यांचे भाऊ त्यांना अनेक कार्यक्रमांसाठी गायन करायला घेऊन जायचे.

View this post on Instagram

A post shared by Nayaab Udhas (@nayaabudhas)

आणखी वाचा – लग्नाला कुटुंबियांचा विरोध, पत्नीचा धर्म वेगळा अन्…; फिल्मी स्टाइल होती पंकज उधास यांची लव्हस्टोरी, लग्न करुनही…

पंकज उधास यांनी ‘ऐ वतन के लोगों’ हे गाणे गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांना या गाण्यासाठी बक्षीस म्हणून ५१ रुपये देण्यात आले. तेव्हापासून त्यांनी गायन आणि गझलच्या दुनियेत आपली कारकीर्द सुरू केली. ‘चंदी जैसा रंग है तेरा’ या सुपरहिट गझलने पंकज यांना संगीत क्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. यानंतर त्यांनी आपल्या अनेक अल्बम आणि गाण्यांनी व सुमधुर आवाजाने सिनेसृष्टीवर राज्य केले.

आणखी वाचा – “त्यांना कर्करोग होता हे…”, ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांच्या निधनानंतर सुरेश वाडकर यांना मोठा धक्का, म्हणाले, “चालत-फिरत असताना…”

गायक पंकज उधास हे करोडोंची संपत्तीचे धनी असल्याचे म्हटले जाते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे मोठ्या नामांकित कंपन्यांच्या महागड्या गाड्या होत्या, ज्यावरून त्याची जीवनशैली खूपच आलिशान असल्याचे दिसून येते. तसेच पेडर रोडवर त्यांचे अलिशान घरही आहे. तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार पंकज उधास यांची एकूण संपत्ती जवळपास २४ ते २५ कोटी रुपये असल्याचेही म्हटले जात आहे.  

Tags: Ghazal Singer Pankaj Udhas Death News in MarathiMusic Legend Pankaj Udhas CareerMusic Legend Pankaj Udhas FamilyMusic legend Pankaj Udhas passes awayMusic Legend Pankaj Udhas Songs Marathi NewsPankaj UdhasPankaj Udhas death Marathi NewsPankaj Udhas diedPankaj Udhas died at 72Pankaj Udhas Latest Marathi Newsगझल गायक पंकज उधास मृत्यूगझल गायक पंकज उधास यांचे ७२ व्या वर्षी निधनपंकज उधासपंकज उधास ताज्या मराठी बातम्यापंकज उधास मृत्यू मराठी बातम्यापंकज उधास यांचे निधनसंगीत दिग्गज पंकज उधास यांचे निधन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Pooja sawant wedding her haldi ceremony photos videos goes viral on social media see details

लवकरच चव्हाणांची सून होणार पूजा सावंत, हळदी कार्यक्रमाला सुरुवात, एका कार्यक्रमाला इतका खर्च, खाण्याचे विविध पदार्थ अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.