हिंदी मनोरंजन सृष्टीतून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे आज म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. पंकज यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. पंकज उधास यांनी ‘ना कजरे की धार’, ‘चिठ्ठी आयी है’, ‘चंदी जैसा रंग है तेरा’ यांसह अनेक लोकप्रिय गाण्यांना आपला आवज दिला. मात्र त्यांचा हा प्रवास इतका साधा व सोपा नव्हता. पंकज यांनी कठोर परिश्रम करत आपले स्थान मिळवले आहे. चला तर जाणून घेऊयात पंकज उधास यांच्या जीवनप्रवासाबद्दल.
पंकज उधास यांचा जन्म १५ मे १९५१ रोजी गुजरातमधील जेतपूर या ठिकाणी झाला. तीन भावांपैकी पंकज हे सर्वात लहान होते. त्याचा मोठा भाऊ मनहर उधास हेदेखील बॉलिवूड चित्रपटांमध्ये गझल गायक आहेत. तर त्यांचे दुसरे मोठे भाऊ निर्मल उधास हेदेखील एक प्रसिद्ध गझल गायक आहेत. पंकज यानं लहानपणापासूनच संगीताची आवड होती. वयाच्या अवघ्या ७ वर्षापासूनच त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. सुरुवातीला फक्त छंद म्हणून ते गायचे, पण त्यांच्या गायनाची प्रतिभा त्यांच्या भावाने ओळखली आणि त्यांना कार्यक्रमांमध्ये गाण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि मग त्यांचे भाऊ त्यांना अनेक कार्यक्रमांसाठी गायन करायला घेऊन जायचे.
पंकज उधास यांनी ‘ऐ वतन के लोगों’ हे गाणे गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांना या गाण्यासाठी बक्षीस म्हणून ५१ रुपये देण्यात आले. तेव्हापासून त्यांनी गायन आणि गझलच्या दुनियेत आपली कारकीर्द सुरू केली. ‘चंदी जैसा रंग है तेरा’ या सुपरहिट गझलने पंकज यांना संगीत क्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. यानंतर त्यांनी आपल्या अनेक अल्बम आणि गाण्यांनी व सुमधुर आवाजाने सिनेसृष्टीवर राज्य केले.
गायक पंकज उधास हे करोडोंची संपत्तीचे धनी असल्याचे म्हटले जाते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे मोठ्या नामांकित कंपन्यांच्या महागड्या गाड्या होत्या, ज्यावरून त्याची जीवनशैली खूपच आलिशान असल्याचे दिसून येते. तसेच पेडर रोडवर त्यांचे अलिशान घरही आहे. तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार पंकज उधास यांची एकूण संपत्ती जवळपास २४ ते २५ कोटी रुपये असल्याचेही म्हटले जात आहे.