‘मिर्झापुर’ या सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन्स चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे अनेक वेळापासून चाहते या सीरिजच्या आगामी सीझनची वाट पाहत आहेत. मात्र निर्माते सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यास उशीर करत आहेत, त्यामुळे अनेक चाहते नाराज आहेत. अशातच आता कालीन भैय्या म्हणजेच अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या सीझनसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. यावरुन चाहत्यांनीच मालिकेच्या प्रदर्शनाचा अंदाज लावला आहे.
‘पंचायत ३’ नंतर, ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने आता चाहत्यांना आणखी एक मोठी भेट दिली आहे. प्राइम व्हिडीओनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे पंकज त्रिपाठी यांची ‘मिर्झापुर’मधील कालीन भैय्याची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या नवीन पोस्टमध्ये तो फोनवर सांगत आहे की आजकल ‘MS3W’ खूप ऐकले जात आहे. आता ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते या मालिकेच्या तारखेबाबत आपापले तर्कवितर्क लावत आहेत.
दोन दिवसांपूर्वी एक खुर्ची असलेली पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्याद्वारे “‘मिर्झापुर’चा तिसरा सीझन कधी येणार आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर आणखी एक पोस्ट शेअर करत या पोस्टमधून “आनंदाचे वातावरण आहे” असे म्हटले गेले होते. त्यामुळे आता ‘मिर्झापुर’च्या चाहत्यांनी यावरून आनंदांज लावायला सुरुवात केली आहे.
या पोस्टखाली नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत ‘महिना सप्टेंबर थर्ड वीक = MS3W’ असे लिहिले. तर एका नेटकऱ्याने लिहिले की, “अरे भाऊ, मला तारीख सांगा, लोक नाराज होत आहेत.” ॲमेझॉन व्हिडिओची ही रणनीती पाहून हे स्पष्ट होते की त्यांना पोस्ट करून प्रेक्षकांचा उत्सुकता वाढवली आहे.
‘मिर्झापूर ३’च्या संदर्भात या पोस्टमुळे ‘मिर्झापुर’च्या अनेक चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत. ‘मिर्झापूर ३’ साठी आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही.
दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, ‘मिर्झापूर ३’ हा जुलैमध्ये प्रदर्शित होऊ शकते किंवा निर्माते ही सीरिज दसरा किंवा दिवाळीपर्यंत प्रदर्शित करू शकतात. पण चाहत्यांच्या मते ‘मिर्झापूर’चा तिसरा सीझन सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.