पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हा सतत चर्चेत असतो. भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर तो अधिक चर्चेत आला. सानियाबरोबर त्याचा दूसरा विवाह होता. पण घटस्फोट घेतल्यानंतर त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर तिसरा विवाह केला. तिसरे लग्न केल्यानंतर त्याला खूप जास्त प्रमाणात ट्रोल केले गेले. अशातच पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. तिसरे लग्न झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा अभिनेत्रीबरोबर फ्लर्ट करत असल्याचे वृत्त समोर आले आहे .त्यामुळे पुन्हा एकदा त्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. (shoaib malik flirt with actress)
शोएबच्या तिसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळाली. त्याला सर्व नेटकऱ्यांनी खूप ट्रोलही केले. अशातच आता पाकिस्तानी अभिनेत्री नवल सईदबरोबर फ्लर्ट करत असल्याचे समोर आले आहे. याबद्दल सांगायचे झाले तर अभिनेत्री रमजानच्या एका शोमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून पोहोचली. त्यावेळी सूत्रसंचालकाने तिला प्रश्न विचारला की, “तुला अभिनेत्यांचे फ्लर्ट करण्यासाठी मेसेज येतात का?”, त्यावर नवलने उत्तर दिलं की, “अभिनेत्यांचे नाही पण क्रिकेटपटूंचे मेसेज येतात. हे ऐकून तिथे उपस्थित असलेले आश्चर्यचकित झाले. यावर पुढे ती म्हणाली, “क्रिकेटपटूकडून मेसेज येतात पण हे योग्य नाही. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधीतत्व करतात. त्यामुळे त्यांनी योग्य पद्धतीने वागले पाहिजे”.
त्यावर सूत्रसंचालकाने तिला विचारले की, “नसीम शाह तुला मेसेज करतात का?”, त्यावर नवल उत्तर देते, “नाही, तो क्रिकेटर सिंगल नाही आहे”. त्यावर सूत्रसंचालकाने विचारलं की, “तो क्रिकेटर शोएब आहे का? त्यावर तिने काहीही उत्तर दिले नाही. फक्त हसली व तो प्रश्न तिने टाळला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या उत्तराने चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शोएबच तो व्यक्ती असावा असे अंदाजदेखील बांधत आहेत. जे क्रिकेटर तिच्याबरोबर फ्लर्ट करतात ती त्यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट काढून ठेवते असेही तिने सांगितले.
नवल ही २५ वर्षाची एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिने २०१७ साली ‘यकिन का सफर’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण शोएबने अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.