‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. कार्तिकीने आजवर तिच्या गायनकलेने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कार्तिकीच्या आवाजाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही कार्तिकी तिच्या चाहत्यांसह नेहमीच संपर्कात राहत असते. अशातच कार्तिकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कार्तिकीने लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. कार्तिकी व रोनित पिसे लवकरच आई-बाबा होणार आहेत. (kartiki gaikwad baby shower look)
कार्तिकीच्या शाही डोहाळ जेवणाचे फोटो, व्हिडीओ समोर आले असून गायिकेवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. कार्तिकी व रोनितने २०२० रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकीने आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत कार्तिकीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम राजेशाही पद्धतीने पार पडला. यावेळी कार्तिकीच्या खास लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कार्तिकीचा डोहाळ जेवणातील पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला.
यावेळी कार्तिकीने खास हिरव्या रंगाची गोल्डन बुट्ट्या असलेली साडी नेसली होती. कार्तिकीच्या या काठापदराच्या साडीने तिचा लूक हेव्ही वाटत होता. साडीवर तिने सारख्याच रंगाची शॉलही घेतली होती. इतकंच नव्हे तर तिने घेतलेल्या या शॉलवर खूपच सुंदर नक्षी कोरण्यात आली होती. कार्तिकीच्या या लुकमध्ये तिने परिधान केलेल्या ब्लाउजने चारचाँद लावले.
कार्तिकीने परिधान केलेल्या सिल्कसाडीसह हेव्ही एम्ब्रॉयडरी करण्यात आलेला ब्लाऊज तिने घातला होता. त्यामुळे या साडीला अधिक शोभा आली. ब्लाउजवर करण्यात आलेली फुलांची कोरीव नक्षी आणि काठाला गोल्डन कारागिरी खास ठरली. त्यामुळे या साडी व ब्लाऊजचा रॉयल अंदाज पाहायला मिळाला. तिने परिधान केलेल्या ब्लाउजच्या मागे असलेल्या जाळीवर चिमुकल्या बाळाचे चित्र कोरण्यात आलं होतं. याशिवाय कार्तिकीने घातलेल्या सुंदर अशा फुलांच्या दागिन्यांनीही साऱ्यांचं लक्ष वेधलं.