‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे पारूच्या हळदीचा दिवस आलेला असतो. पारू तिच्या आईच्या फोटोजवळ उभी राहून सांगते की, माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळंच लिहिलं आहे आणि काहीतरी वेगळंच घडतंय. जर आज मी हरीश सरांना हे सगळं सत्य सांगू शकले नाही तर मी हे घर सोडूनही जायला तयार आहे. माझ्यामुळे इतर कोणालाही त्रास व्हायला नको इतकंच मला वाटते. त्यानंतर ती गणीजवळ येते तेव्हा तो झोपलेला असतो आणि गणीला सांगते की, आजवर याची मी आई सारखीच काळजी घेतली आणि याने सुद्धा माझ्यावर आईसारखंच प्रेम केलं मात्र आता मी नसताना याने खूप शिकावं इतकीच माझी इच्छा आहे. (Paaru Serial Update)
तर तिच्या वडिलांच्या जवळ जात हात जोडून त्यांची माफी मागते. त्यानंतर घरात शेवटचा दिवस असल्याने ती गणीसाठी धपाटे चा बनवायचा घाट घालते. यावर गणी आणि मारुती दोघेही तिला म्हणतात की, तू कशाला कामाला लागलीस. त्यावर ती सांगते की, आज माझा शेवटचा दिवस आहे. मला तुमची सेवा करु द्या. गणी व मारुतीही त्या वेळेला खूपच भावुक झालेले असतात. त्यानंतर पारू जेव्हा बंगल्यात येते तेव्हा आदित्यही पारूकडून वचन मागतो की, तू माझ्याबरोबर शेवटपर्यंत असशील असं मला वचन दे. यावर पारू सांगते की, आयुष्याच्या शेवटापर्यंत मी फक्त तुमचीच असेल. मात्र आधी त्याला ते काही कळत नाही. त्यानंतर जेव्हा प्रिया येते, तेव्हा प्रियाला घेऊन पारू प्रीतमच्या खोलीत जाते. तेव्हा प्रीतमही पारूचं कौतुक करतो आणि सांगतो की, आता तू आमच्याजवळ नसणार आहेस मात्र तुला कधीही काही लागलं तर तू हक्काने या मित्राला आवाज देशील आणि मी तुझ्यासाठी नक्की येईल.
तुझ्यासारखी मैत्रीण मला मिळाली आहे हे माझं भाग्यच आहे. तू माझ्या आयुष्यात आधी आली असतीस तर कदाचित हा प्रीतम काहीसा वेगळाच असता. हे ऐकून प्रियालाही बरं वाटतं. तर प्रियाला पारू सांगते की, प्रीतम सर थोडेसे खोडकर आहेत पण ते मनाने खूपच चांगले आहेत. त्यानंतर पारू किचनमध्ये काम करत असते तेव्हा सावित्री तिला सांगते की, तू काही काम करु नकोस. मला इथे काम केल्याशिवाय बरं वाटत नाही तुम्हाला तर हे माहीतच आहे ना असं पारू उत्तर देते. यावर सावित्री गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवायला सांगते.
मात्र पारू गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवायला स्पष्ट असा नकार देते आणि सांगते की, मी काही झालं तरी आजच्या आज हरीश सरांना हे सगळं काही सांगणार आहे. त्यानंतर तिथे अहिल्यादेवी व श्रीकांत येतात आणि पारूचं कौतुक करतात आणि पारूला शुभेच्छा देऊन निघून जातात. आता मालिकेच्या पुढील भागात हरीश समोर पारू व्यक्त होणार का?, हरीश पारुला समजून घेईल का?, हे सारं पाहणं रंजक ठरणार आहे.