शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आयुष्याच्या उत्तरार्धात बाबा नसतानाही…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला, “आईने ६५व्या वर्षी…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 18, 2024 | 10:05 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dil Dosti Duniyadari fame actor Suvrat Joshi shared a post of his London trip with his mother.

“आयुष्याच्या उत्तरार्धात बाबा नसतानाही...”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला, “आईने ६५व्या वर्षी...”

छोट्या पडद्यावरून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत रंगभूमीच्या पडद्यापासून चित्रपटाचा मोठा पडदा गाजवणारा अभिनेता म्हणजे सुव्रत जोशी. टेलिव्हिजनमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सुव्रतने रंगभूमीपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेत सुजय साठे ही भूमिका साकारत त्याने  प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यानंतर ‘शिकारी’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा नावाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता सोशल मीडियाद्वारेही तितकाच चर्चेत राहत असतो. सोशल मीडियावर तो आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपपर्कात राहत असतो. अशातच  त्याने नुकतीच  शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आईबरोबरचे लंडनमधील फोटो शेअर केले आहेत. याशिवाय एक आईच्या लंडनवारीबद्दलची एक खास पोस्टही शेअर केली आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मध्यमवर्गीय परिस्थितीत वाढवतानाही आई-बाबांनी, नेहेमीच मला अनुभवाच्या पातळीवर सकस व सुंदर असे काय मिळेल याची काळजी घेतली. खिशाला खार लावून, धाडस करुन उत्तमोत्तम पुस्तके, चित्रपट व नाटक माझ्या बालपणाच्या ओंजळीत भरभरुन ओतली. यात स्वतःच्या इच्छांना मुरड घातली. मी माणूस म्हणून व कलाकार म्हणून जे काही थोडेफार कमावले त्यात या बालपणी मिळालेल्या विविधरंगी अनुभवाच्या कंपास पेटीचा सिंहाचा वाटा आहे”.

View this post on Instagram

A post shared by Sula (@suvratjoshi)

यापुढे त्याने असं म्हटलं की, “आता आयुष्याच्या उत्तरार्धात बाबा नसतानाही आई नेटाने, स्वाभिमानाने आयुष्याचा एक-एक धागा विणत असते. यात आता तिला नवे अनुभव देण्यासाठी माझ्यावर राज्य आहे. असे वाटते की, मला कामामुळे, कुतूहलाने प्रौढ आयुष्यात जे काही नवे अनुभव आले. त्यात माझ्या आई-वडिलांना भागीदार करुन घेता आले पाहिजे. आपल्या चष्म्यातून जे आता नवे जग आपल्याला दिसते त्याची चव त्यांनाही चाखून बघायला मिळेल यासाठी मी प्रयत्नशील असलो पाहिजे. आता बाबा नाही पण म्हणून आईने माझ्या नजरेतून लंडन बघावे अशी तीव्र इच्छा होती. अखेर या उन्हाळ्यात सगळे जुळून आले”. 

आणखी वाचा – मेष, वृषभ व  कर्क राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस आनंदाचा असेल, नोकरी-व्यवसायात होणार लाभ, जाणून घ्या…

यापुढे त्याने आईच्या लंडनवारीबद्दल असं म्हटलं की, “आईच्या लंडनवारीची तयारी करायला घेतली. भरपूर पायपीट करायची असल्याने तिला बूट घ्यायचे ठरले. तिच्या पायाचे AI मॅपिंग करून वगैरे अगदी अद्ययावत बूट घेतले. पण ते घातल्या घातल्या आईचा थोडा तोल गेला. तिने आयुष्यात पासष्टव्या वर्षी प्रथमच बूट घातले होते. आजवर याआधी आईने कधी बुटच घातले नाहीत. इतकी बारीक आणि तरीही मोठी गोष्ट कधी माझ्या ध्यानातच आली नव्हती. आपल्या आधीच्या पिढीने साधं जगायची साधना केली. त्याचा प्रचंड आदर आहेच. ती मूल्य हरवू न देता त्यांनीही थोडं भोगावं आणि त्यांना त्याची चोरी वाटू नये अशी तजवीज आपण त्यांच्यासाठी करावी”.

आणखी वाचा – धक्कादायक! चित्रपटाच्या सेटवर २० फूट उंचीवरून पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

दरम्यान, सुव्रतची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून अनेकांनी त्याला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याने लिहिलेल्या या पोस्टमुळे व त्याने व्यक्त केलेल्या आईबद्दलच्या भावनांमुळे अनेकांनी त्याचे कौतुक करत त्याला शुभेच्छादेखील दिल्या आहेत.      

Tags: marathi actormarathi entertainment newssuvrat joshi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Paaru Serial Update

हरीशसमोर पारू होणार व्यक्त?, सत्य समजल्यावर सगळे समजून घेतील का?, आदित्य यावर काय उत्तर देणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.