शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धक्कादायक! चित्रपटाच्या सेटवर २० फूट उंचीवरुन पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 18, 2024 | 9:22 am
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Sardar-2 movie set a stuntman died for falling from a height of 20 feet while shooting know more

धक्कादायक! चित्रपटाच्या सेटवर २० फूट उंचीवरून पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

दिग्दर्शक पीएस मिथरान यांच्या तमिळ स्पाय ॲक्शन-थ्रिलर ‘सरदार -२’ च्या सेटवरून एक मोठी बातमी समोर येत आहे. सेटवर शूटिंग दरम्यान एक अपघात झाला आहे, ज्यामध्ये इझुमलाई नावाच्या स्टंटमनचा मृत्यू झाला आहे. ॲक्शन सीनचे शूटिंग करत असताना स्टंटमन २० फूट उंचीवरून पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या चित्रपटात अभिनेता कार्ती मुख्य भूमिकेत आहे.

‘इंडिया टुडे डॉट इन’ने प्रोडक्शन टीमच्या जवळच्या एका सूत्राचा हवाला देत सांगितले की, कार्तीच्या ‘सरदार-२’ चित्रपटाचे शूटिंग चेन्नईतील एका भव्य सेटवर सुरू होते. एक ॲक्शन सीन शूट होत होता. त्यानंतर अचानक स्टंटमन सुमारे २० फूट उंचीवरून खाली पडला. त्याला गंभीर दुखापत झाली आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

The auspicious pooja for #Karthi starrer #Sardar2 took place recently and the shooting of the film is scheduled to start on July 15th 2024 in grand sets in Chennai.@Karthi_Offl @psmithran @Prince_Pictures @lakku76 @venkatavmedia @thisisysr @george_dop @rajeevan69 @dhilipaction… pic.twitter.com/nVraSAbMi4

— Prince Pictures (@Prince_Pictures) July 12, 2024

आणखी वाचा – Video : मराठी वाचता यावं म्हणून वैभव मांगलेंची मुलांवर सक्ती, मुलांच्या वाचनाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहिती घेतली जात असून काही काळ या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाबाबत चित्रपटाच्या टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जाहीर करण्यात आलेले नाही. ‘सरदार-२’ हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘सरदार’चा दुसरा भाग आहे.

आणखी वाचा – मेष, वृषभ व  कर्क राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस आनंदाचा असेल, नोकरी-व्यवसायात होणार लाभ, जाणून घ्या…

या चित्रपटात कार्तीशिवाय राशी खन्ना, राजिशा विजयन, चंकी पांडे आणि लैला यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर लगेचच दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात  आला आहे. दरम्यान स्टंटमॅनच्या अपघाती निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Tags: entertainment newsSardar-2Stuntman Death
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Dil Dosti Duniyadari fame actor Suvrat Joshi shared a post of his London trip with his mother.

“आयुष्याच्या उत्तरार्धात बाबा नसतानाही...”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला, “आईने ६५व्या वर्षी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.