Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे प्रीतम विचार करत असतो की, काल जे काही झालं ते चुकीचं झालं. शिवाय प्रिया मॅडम ही मला कायमच्या सोडून गेल्या. मी त्यांच्याशिवाय जगण्याचा विचारही करु शकत नाही तर इकडे प्रिया प्रीतमला भेटायला म्हणून आलेली असते तेव्हा ती चोरवाटेने बंगल्यात शिरते. बंगलातल्या सुरक्षारक्षकांना कोणीतरी आत घुसल्याचा भास होतो आणि ते चोर चोर म्हणून ओरडू लागतात. त्यानंतर घरातील सगळीच मंडळी बाहेर येतात आणि विचारतात की, कोण आत मध्ये आल आहे. यावर सुरक्षारक्षक सांगतात की, कोणीतरी आत आलं याचा मला भास झाला. तेव्हा श्रीकांत सांगतात की तुम्हाला भास झाला असेल कोणीच नसेल किंवा आपल्या आवाजाने तो चोर पळूनही गेला असेल.
त्यानंतर श्रीकांत सगळ्यांना बोलतात की आपण आतमध्ये जाऊया आणि आदित्यला सांगतात तुला सुरक्षारक्षक वाढवायचे असतील तर वाढवून घे. यावर आदित्य होकार देतो. त्यानंतर सगळेच जात असतात तेव्हा पारू सुद्धा त्या आवाजाने आलेली असते तेव्हा आदित्य पारुला हाक देत सर्व ठीक आहे ना असं म्हणतो. आणि त्यानंतर दोघेही आपापल्या वाटेला जातात. पारू मागे येते आणि बघते तर प्रिया मॅडम खाली बसलेल्या तिला दिसतात. त्या प्रिया जवळ जातात आणि विचारतात तुम्ही इथं काय करताय तेव्हा ती सांगते की, काल जे काही झालं ते व्हायला नको होतं. मला काही करुन प्रीतम सरांना शेवटचा भेटायचे आहे. कारण मी आता कायमची गावी जाणार आहे हे ऐकल्यावर पारूला टेन्शन येतं.
त्यानंतर पारू चोरीने प्रियाला बंगल्यात घेऊन येते तर इकडे प्रीतम प्रियाच्याच विचारत असतो आणि त्याला प्रिया समोर दिसते. मात्र त्याला असं वाटतं की, ही प्रिया नसून भास आहे. त्यानंतर थोड्या वेळाने तिथे पारू सुद्धा येते तेव्हा पारूला विचारतो, तू सुद्धा भास आहेस का?, तेव्हा प्रीतमला पारू सांगते नाही मी खरीच पारू आहे. आणि प्रिया सुद्धा खरी असल्याचा त्याला नंतर कळतं. त्यानंतर तो गुडघ्यावर बसून प्रियाला प्रपोज करतो. प्रिया विचारते की, पण तुमच्या सिगारेट दारूच काय?, यावर प्रीतम सांगतो की, मी सगळं काही सोडलं आहे. मला तुमच्या बरोबर राहायचं आहे त्यासाठी मी काहीही सोडायला तयार आहे. इतक्यात दरवाज्यात आदित्य येतो आणि विचारतो की, मला आणि आईला सुद्धा सोडशील का?, हे ऐकल्यावर सगळेच जण आदित्यकडे पाहत शॉक होतात. त्यानंतर आदित्य प्रीतमवर खूप संताप करतो आणि पारूवरही ओरडतो. आदित्यला कळतच नाही की, नेमकं हे काय होत आहे. त्यानंतर आदित्य प्रीतम समोर दोन पर्याय ठेवतो की एक तर तू हिला घेऊन आत्ताच्या आत्ता घराबाहेर पड किंवा आईनं सांगितलेल्या मुलीशी म्हणजे दिशा बरोबर तू लग्नाला तयार हो, हे दोनच पर्याय तुझ्याकडे आहेत तेव्हा प्रीतम निर्णय घेतो आणि म्हणतो की आता हा आपल्या दोघांमधला सवाल आहे. असं म्हणत प्रियाच्या हाताला धरतो आणि बाहेर निघून जातो. तर पारू आदित्यला खूप समजावण्याचा प्रयत्न करते.
आणखी वाचा – Suhasini Deshpande Death : मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन
आता आदित्य पारुच्या सांगण्यावरुन शांत होईल का?, प्रीतमला तो समजून घेईल का हे मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरेल. तर मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, किचनमध्ये सावित्री व पारू बोलत असतात तेव्हा सावित्री म्हणते की, अहिल्यादेवींनी हाताला धरुन तिला बाहेर काढायला पाहिजे, हे दिशा ऐकते आणि म्हणते तुम्ही माझ्याबद्दलच बोलत आहात ना?, तुझी हिम्मत कशी झाली माझ्याबद्दल बोलायची असं म्हणून ती सावित्रीवर हात उगारते. तितक्यात पारू दिशाचा हात धरते. आता पारू दिशाला अद्दल घडवणार का?, हे सारं पाहणं रंजक ठरेल.