Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व सुरू होऊन आता जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. जसजसे या घरातील स्पर्धकांनी एकमेकांशी वेळ घालवला तसतसं त्यांच्यातील काही नातीदेखील समोर आली. या घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासून घरातील काही स्पर्धकांमध्ये मैत्री पहायला मिळाली तर काहींमध्ये मैत्रीतील प्रेम. मात्र आता तेच नाते हळूहळू बदलतानादेखील पहायला मिळत आहे. या घरातील नात्यांची समीकरण कधी बदलतील हे सांगू शकत नाही. कोणी कधी प्रेमाला ठोकर मारतं तर कोण पस्तावतचं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच नात्यांची नवी समीकरण तयार होतात. आता निक्की, अरबाज, अभिजीत यांच्याबाबतीतही नात्यांची नवी समीकरण तयार झालेली पाहायला मिळत आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
अशातच’बिग बॉस मराठी’चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या नव्या प्रोमोमध्ये सूरज व आर्या निक्की, अरबाज, अभिजीत यांच्यातील नात्यांवर एक खास गाणं म्हणताना दिसून येत आहेत. त्यावर घरातील इतर सदस्यही मजा घेताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज चांगलाच माहोल बनणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची मेजवानी मिळेल. यावेळी सूरज ‘ठुकराके मेरा प्यार मेरा…’ हे गाणं सुरु करताच वर्षा ताई त्याला साथ देतात. यानंतर आर्याही लगेच मुझे छोडकर जो तुम जाओगे बडा पछताओगे’ हे गाणं म्हणते. यावर बाकीचेही तिला चांगलीच साथ देत मज्जा घेतात.
निक्कीने टीम A ला रामराम केल्यानंतर तिला आता अभिजीतचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे. त्यात बिग बॉस’ने मानकाप्याच्या टास्कसाठी निक्की व अभिजीतची जोडी केली आहे. यामुळे अरबाजला कुठे तरी दुःख होत असून त्याला असुरक्षितताही वाटत आल्याचे दिसून येत आहे. त्यात कालच्या भागात अरबाजने निक्कीवर रागावून घरात आदळआपटही केली. निक्कीमुळे तो दुखावला गेला असून रागाच्या भरात त्याने घरात राडा केला. राग अनावर होत त्याने घरातील वस्तू फेकून दिल्या.
आणखी वाचा – Suhasini Deshpande Death : मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन
त्यामुळे आता किती दिवस निक्की व अभिजीतची जोडी एकत्र दिसेल? आणि यामुळे अरबाजचे काय होणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. तसेच घरातील इतर स्पर्धक अरबाज-निक्की यांच्या तुटलेल्या मैत्रीचा फायदा घेणार की, त्यांना पुन्हा एकत्र आणणार? हे पाहणेदेखील रंजक ठरणार आहे. असं असलं तरी निक्की व अभिजीत या दोघांची मैत्री आणि त्यांची दिल दोस्ती दुनियादारी मात्र सर्वच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.