Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धक मंडळी तुफान राडे करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांमध्ये जोरदार वाद पाहायला मिळत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या भागांमध्ये निक्की व अरबाज यांच्यात जोरदार भांडण झालं आणि यावरुन अरबाजने आदळआपट केलेली पाहायला मिळाली. निक्की अरबाजला पूर्णवेळ समजवत होती. मात्र, घरातील इतर सदस्य निक्की फक्त गेमसाठी हे करतेय, अरबाज तिच्या नादी लागू नकोस असा सल्ला त्याला देत होते. निक्की ऐकत नाही हे पाहून अरबाजचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला.
अरबाजला राग आला तेव्हा टीम मधील सदस्यांनी रागावर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं. मात्र अरबाजने किचनमध्ये येत निक्की समोर जोरदार एक भांड फोडलं. त्यानंतर निक्कीने यावर प्रतिक्रिया देत, हे काय सुरु आहे बालिशपणा, असेही म्हटलं. त्यानंतर दोघेही बेडरूम मध्ये येतात आणि बोलू लागतात तेव्हा निक्की अरबाजला विचारते “तुला माझी गरज नाहीये ना?’, यावर अरबाज उत्तर देत म्हणतो, “नाही”. आणि त्यानंतर तो बेडरूम मधील खुर्ची उचलतो आणि जोरात खाली आपटतो आणि तोडून टाकतो. यावर त्याला घरातील सगळेच मंडळी समजावण्याचा प्रयत्न करत मात्र तो काहीच समजून घेत नाही.
त्यानंतर ‘बिग बॉस’ अरबाजला आणि घरातील सर्व सदस्यांना लिविंग एरियामध्ये बोलवतात आणि घरात तोडफोड केल्याने आता शिक्षेस तुम्ही पात्र आहात असं म्हणतात. घरात तोडफोड केल्याने ही शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल असं म्हणत त्याला शिक्षा सुनावतात. तर ते अरबाजला सांगतात की, तुम्ही ‘बिग बॉस’च्या घराचं नुकसान केलं आहे त्यामुळे तुम्हाला ही शिक्षा भोगावीच लागेल असे म्हणत ‘बिग बॉस’ अरबाजकडून कॅप्टनची उमेदवारी काढून घेतात.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : प्रीतम-प्रियाचं प्रेम आदित्यला अमान्य, पारू समजूत काढू शकेल का?, पाहणं ठरणार रंजक
“घरात तोडफोड करणं अत्यंत चुकीचं आहे” असं ‘बिग बॉस’कडून अरबाजला सांगण्यात आलं. तसेच याची शिक्षा म्हणून या आठवड्यात अरबाजकडून कॅप्टन्सीची उमेदवारी काढून घेण्यात आली आहे. अरबाजकडून कॅप्टनसी उमेदवारी काढून घेतल्यावर वर्षा उसगांवकरांनी निक्कीला चांगलंच सुनावलं असल्याचंही दिसलं.