‘पारू’ या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत आहेत. अजयच्या तावडीतून आदित्यने पारूची सुटका केल्यानंतर पारूवरील मोठं संकट टळलेलं पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता पारूने पुन्हा एकदा तिच्या आयुष्यातील हा काळा दिवस विसरून कामाला सुरुवात केली आहे. किर्लोस्करांच्या घरी प्रीतम व दिशाच्या साखरपुड्याची जंगी तयारी सुरू असते. प्रीतम व दिशा यांच्या साखरपुड्यासाठी बरीचशी मंडळी ही किलोस्करांच्या मेन्शनमध्ये जमलेली असतात. यावेळी दिशा सर्वांसमोर प्रीतम बरोबरच्या प्रेमाची कबुली देते तर प्रीतमही आईचं मन राखण्यासाठी दिशा बरोबर साखरपुड्यास तयार होतो. (Paaru Serial Update)
लवकरच हा साखरपुडा समारंभ संपन्न होणार असतो. तर एकीकडे दामिनीने पारूवर साखरपुड्याच्या अंगठीची मोठी जबाबदारी सोपवलेली असते. पारु ही अंगठी हरवू नये म्हणून तिच्या रुमालात बांधून कमरेला खोचून ठेवते. तेव्हा दामिनी गुपचूप ती अंगठी चोरते आणि त्यानंतर पारूला येऊन विचारते की, साखरपुड्याची अंगठी मला हवी आहे. आता साखरपुडा सुरु होईल आणि अहिल्या वहिनी केव्हाही ती अंगठी मागतील. हे ऐकल्यावर पारूच्या लक्षात येतं की आपल्याकडे अंगठी नाही आहे.
त्यानंतर पारू अंगठीची शोधाशोध करू लागते. आदित्यलाही अंगठी हरवल्याचे सत्य कळतं तेव्हा आदित्यही गोंधळून जातो. पारूबरोबर गणीही अंगठी शोधण्यात व्यस्त असतो. तर इकडे दामिनीने ती अंगठी चोरून तिच्या कपाटात ठेवलेली असते. अशातच मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे. आदित्यने दिशा व प्रीतमच्या साखरपुड्याची जबाबदारी एका इव्हेंट कंपनीला सोपवलेली असते.
त्या इव्हेंटमध्ये एक मुलगी इंटर्न म्हणून काम करत असते. या मुलीच्या प्रेमात प्रीतम पडतो. प्रीतम तिला पाहता क्षणी प्रेमात पडतो. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रीतम पारू समोर प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे, मात्र पारू त्याला सांगते की आता तुमचा साखरपुडा झाला आहे तर तुम्ही असं काही बोलू नका. आता प्रीतम खरोखर त्या मुलीच्या प्रेमात पडणार का?, ती दामिनीने लपवलेली अंगठी साखरपुड्यावेळी सापडणार का?, हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.