सिनेसृष्टीत बऱ्याच कलाकार मंडळींची लग्न चर्चेत राहिली. अशातच एका कलाकार जोडीचं लग्न विशेष चर्चेत राहिलं. ही कलाकार जोडी म्हणजे पियुष रानडे व सुरुची अडारकर. दोघांनी गुपचूप लग्न सोहळा उरकत चाहत्यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का दिला. थेट दोघांनी त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. त्यांचा लग्नसोहळ्यातील खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी सुरुची-पियुषच्या लग्नाला हजेरी लावली होती. (piyush ranade with shreya bugade)
सुरुची व पियुषच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. लग्नानंतर ही जोडी संसारात रमलेली दिसली. सुरुची व पियुषच्या लग्नात नवऱ्यामुलाची बहीण म्हणून अभिनेत्री श्रेया बुगडेने मिरवलं. पियुषची मानलेली बहीण श्रेया बुगडे हिने देखील भावाच्या लग्नात धमाल केलेली पाहायला मिळाली. श्रेयानेही पियुष-सुरुचीच्या लग्नात मज्जा मस्ती केली. सुरुची-पियुषच्या लग्नाच्या तयारीत श्रेया बुगडेचा खारीचा वाटा आहे.
अशातच आता सुरुची व पियुष हे दोघेही श्रेया व तिच्या नवऱ्यासह एकत्र धमाल, मस्ती करताना दिसले. चौघांनी एकत्र डिनरचा प्लॅन केला होता. एकत्र जेवण करताना त्यांनी बऱ्याच दिवसांनी एकत्र धमाल केली. चौघांचे एकमेकांबरोबरचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. सुरुचीने तिच्या नणंदबाईंबरोबर खास फोटो शेअर केला आहे. तर पियुषचा ही बहीण व भावोजीबरोबरचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.
कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून चौघेही एकत्र एन्जॉय करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी श्रेयाने शिवाजी पार्क दादर येथे ‘द बिग फिश अँड कंपनी’ हे नवं रेस्टॉरंट सुरु केलं. या नव्या हॉटेलच्या शुभारंभादिवशी मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी श्रेयाच्या नव्या हॉटेलला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. श्रेयाच्या या नव्या हॉटेलला पियुष रानडे व सुरुची अडारकर यांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. सध्या पियुष हा ‘काव्यांजली सखी सावली’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे.